नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देणाऱ्या कंपन्यांना कडक शिक्षा ठोठावण्यात येणार असून, त्यासाठी सरकार नवा ग्राहक संरक्षण कायदा आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी दिली. माध्यमांत चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या अनेक जाहिराती येत असल्याची कबुली देताना कंपन्यांचे दिशाभूल करणारे दावे आणि जाहिरातींना लगाम घालण्याच्या विविध कायद्यांत तरतुदी असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या ग्राहक संरक्षण कायद्यावर काम सुरू असून, या कायद्याच्या प्रति मं^त्रिमंडळात ठेवण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. सोन्याचे हॉलमार्क करणे बंधनकारक करण्यात येणार असून, संबंधित कंपनीला सोन्यावर वजन आणि स्वत:चे नाव मुद्रित करावे लागणार आहे. उत्पादक आणि सेलिब्रिटींकडून करण्यात येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा बसावा, तसेच अशा कृत्यांत गुंतलेल्यांना शिक्षा ठोठावली जावी, यासाठी सरकार एक प्रणाली आणेल, असे पासवान यांनी सांगितले.
फसव्या जाहिरातींसाठी होणार कडक शिक्षा
By admin | Published: March 22, 2017 12:33 AM