नितीन अग्रवाल, नवी दिल्लीफक्त २५१ रुपयांमध्ये जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन आणणारी रिंगिंग बेल्स ही कंपनी पुन्हा संकटात सापडल्याचे दिसून येते. भाजपचे खासदार आणि संसदीय समितीचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी या कंपनीविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल केला आहे.नोएडा फेज ३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सोमय्या यांनी या कंपनीचे अमित गोयल, अशोक चड्डा यांना आरोपी बनविले आहे. या तिघांवर कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ नुसार एफआयआर नोंदविण्यात आला आहे. रिंगिग बेलशी जोडलेल्या एका अधिकाऱ्याने एफआयआर नोंदविण्यात आल्याचे स्पष्ट केले असले तरी अधिक माहिती देण्याचे टाळले. या फोनच्या आगाऊ नोंदणीसाठी लोकांकडून पैसे मागण्यात आले आहे. २५१ रुपये मोबाईल फोन घरी पोहोचल्यानंतर द्यायचे आहे, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.
स्वस्तात स्मार्ट फोन देणारी रिंगिंग बेल्स संकटात
By admin | Published: March 24, 2016 12:48 AM