नवी दिल्ली: फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत मोठी दंगल झाली होती. त्या दंगलीत मोठी जीवित आणि आर्थिकहानी झाली होती. त्या दंगलींबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं आता मोठं विधान केलं आहे. 'दिल्लीत झालेली दंगल पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली होती. फिर्यादीने कोर्टात सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलकांचे आचरण स्पष्टपणे दर्शवते की, ही एक सुनियोजित दंगल होती, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे.
हिमाचलच्या लाहौल स्पीतीमध्ये ट्रेकिंगला गेलेले 12 जण अडकले, 2 जणांचा मृत्यू
दिल्ली दंगलीतील आरोपी मोहम्मद इब्राहिमला जामीन नाकारताना, न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले, दंगलखोरांनी शहरातील अनेक ठिकाणांवर लावलेले सीसीटीव्ही बंद केल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या पूर्वनियोजित षडयंत्राची पुष्टी होते. दंगलखोरांनी पोलिस अधिकाऱ्यांवरही लाठ्याकाठ्यांनी निर्दयीपणे हल्ला केल्याचं समोर आलं. ही दंगल अचानकपणे घडली नव्हती, हा एका मोठा पूर्वनियोजित कट होता, असंही कोर्टाने म्हटले आहे.
चीनकडून लवकरच मदतीची पहिली खेप अफगाणिस्तानला जाणार, तालिबानने मानले आभार
आरोपी मोहम्मद इब्राहिमने दंगलीत तलवारीचा वापर केला होता. त्याच्या तलवारीने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण, त्याच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, दंगलीत मृत्यू झालेल्या रतनलालचा तलवारीने मृत्यू झाला नाही. इब्राहिमने फक्त स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी तलवार उचलली होती. पण, न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, इब्राहिमने तलवार उचलली, यामुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत किंवा मृत्यू होऊ शकतो. अशा शस्त्राचा वापर इब्राहिमने केला, असे म्हणत कोर्टाने त्याला जामीन देण्यास नकार दिला.