पत्रा फाडून जखमींना काढले बाहेर
By admin | Published: July 18, 2016 11:32 PM
हा अपघात झाला; तेव्हा पाऊस सुरू होता. दुसरीकडे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने मदतकार्यात अडथळे आले. सुरुवातीला रुग्णवाहिका थेट घटनास्थळापर्यंत जातील, यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका अपघाग्रस्त बसेस्जवळ आल्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. काही जखमी प्रवासी बसचा पत्रा तसेच आसनांमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढता येत नव्हते. वयोवृद्ध प्रवाशांना मार लागल्याने भोवळ आली होती. पत्रा व आसने ओढता येत नसल्याने जखमींना बाहेर काढता येत नव्हते. म्हणून ग्रामस्थांनी दोर ट्रॅक्टरला बांधून पत्रा व आसने ओढून जागा मोकळी केली. त्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. दोन्ही बसेसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याने त्यांना जळगावला हलविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या तब्बल ४ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
हा अपघात झाला; तेव्हा पाऊस सुरू होता. दुसरीकडे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने मदतकार्यात अडथळे आले. सुरुवातीला रुग्णवाहिका थेट घटनास्थळापर्यंत जातील, यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका अपघाग्रस्त बसेस्जवळ आल्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. काही जखमी प्रवासी बसचा पत्रा तसेच आसनांमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढता येत नव्हते. वयोवृद्ध प्रवाशांना मार लागल्याने भोवळ आली होती. पत्रा व आसने ओढता येत नसल्याने जखमींना बाहेर काढता येत नव्हते. म्हणून ग्रामस्थांनी दोर ट्रॅक्टरला बांधून पत्रा व आसने ओढून जागा मोकळी केली. त्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. दोन्ही बसेसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याने त्यांना जळगावला हलविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या तब्बल ४ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.शर्थीने केली वाहतूक सुरळीतअपघातानंतर सर्वात आधी वाहतूक सुरळीत करणे आवश्यक असल्याने प्रयत्न केले जात होते. परंतु दोन्ही बसेस रस्त्याच्या मधोमध असल्याने अडचणी येत होत्या. बसेस हलविण्यासाठी जळगावातून क्रेन मागविण्यात आले. परंतु क्रेन येण्याआधीच वावडदा येथील रवी कापडणे यांनी त्यांच्या मालकीचे जेसीबी मशीन आणून दोन्ही बसेस रस्त्यावरून बाजूला हटविल्या. एक बस रस्त्याच्या बाजूला करण्यात आली तर दुसरी बस अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ओढून सोडण्यात आली. त्यानंतर जिल्हा वाहतूक शाखा, एमआयडीसी पोलीस ठाणे, मुख्यालयातील पोलीस कर्मचार्यांनी शर्थीने प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली.अधिकार्यांचा ताफा घटनास्थळी दाखलया अपघाताची माहिती झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, एस.टी. महामंडळाच्या जळगाव विभागाच्या नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेची पाहणी करून माहिती जाणून घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल बाळू पाटील, जितेंद्र राठोड, सचिन मुंडे, जितेंद्र राजपूत, सुशील मगरे, प्रकाश पवार, समाधान पाटील, विजय नेरकर यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रवी कापडणे, विलास गोपाळ, अर्जून राजपूत, जाकीर खाटीक, राहुल पवार, श्रीकृष्ण पाटील, प्रमोद चव्हाण, पिंटू मराठे, सुमीत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिसांना मदतकार्यात सहकार्य केले. सुरुवातीला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी येण्यास विलंब होत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी त्यांच्या वाहनांच्या साहाय्याने जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यास सुरुवात केली होती. अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड आरडाओरड व रडारड सुरू होती.