नवी दिल्ली - भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. ४२ वर्षीय सुनक यांनी रविवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत विजय मिळवला. मूळ भारतीय म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणारे ते पहिले भारतीय आहेत. ऋषी यांचे मूळ भारताचे आहेत. त्यांचे आजोबा पंजाबचे होते. ऋषी यांची पत्नी अक्षता मूर्ती देखील भारतीय आहे. अक्षताचे वडील एन नारायण मूर्ती हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. इन्फोसिस या आयटी कंपनीची स्थापना ऋषी सुनक यांनी केली होती.
ऋषी सुनक(Rishi Sunak) यांचा जन्म १२ मे १९८० रोजी यूकेच्या साउथम्प्टन येथे झाला. त्यांच्या आईचे नाव उषा सुनक आणि वडिलांचे नाव यशवीर सुनक होते. तीन भावंडांमध्ये ते सर्वात मोठे. त्यांचे आजोबा पंजाबचे होते. १९६० मध्ये, ते आपल्या मुलांसह पूर्व आफ्रिकेत गेले. पुढे त्यांचे कुटुंब येथून इंग्लंडला आले. तेव्हापासून सुनकचे संपूर्ण कुटुंब इंग्लंडमध्ये राहते. भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी ऋषी यांचे लग्न झाले आहे. सुनक आणि अक्षता यांना दोन मुली आहेत. अनुष्का सुनक आणि कृष्णा सुनक अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.
कॉलेजमध्ये भेटले आणि प्रेमात पडलेऋषी सुनक यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इंग्लंडमधील 'विंचेस्टर कॉलेज'मधून केले. त्यांनी पुढील शिक्षण ऑक्सफर्डमधून केले. २००६ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही मिळवली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएच्या अभ्यासादरम्यान ऋषी सुनक यांची अक्षता मूर्ती यांची भेट झाली. अक्षता इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा नारायण मूर्ती यांची मुलगी आहेत. कॉलेजमध्ये असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २००९ मध्ये दोघांनी बंगळुरूमध्ये भारतीय प्रथापरंपरेनुसार लग्न केले. अक्षता इंग्लंडमध्ये स्वतःचा फॅशन ब्रँडही चालवते. सध्या, ती इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. नोकरी, व्यवसाय आणि मग राजकारणात सक्रीयस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए केल्यानंतर ऋषीला 'गोल्डमॅन सेक्स'मध्ये नोकरी मिळाली. ऋषी सुरुवातीपासूनच खूप टँलेन्टेड आहे. २००९ मध्ये त्यांनी नोकरी सोडून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढत गेला. २०१३ मध्ये त्यांना आणि त्यांच्या पत्नीची Catamaran Ventures UK Ltd चे संचालक म्हणून नियुक्ती झाली. २०१५ मध्ये त्यांनी फर्मचा राजीनामा दिला परंतु त्यांची पत्नी या कंपनीशी संलग्न राहिली. या कंपनीची स्थापना अक्षताचे वडील एन. नारायण मूर्ती यांनी केली होती.
ऋषी सुनक यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. २०१५ मध्ये त्यांनी रिचमंडमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. यानंतर १३ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना इंग्लंडचे अर्थमंत्री बनवण्यात आले. त्याच वर्षी जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर सर्व आरोप झाले तेव्हा ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला. यानंतर जॉन्सन मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर नव्या पंतप्रधानांच्या निवडणुकीला सुरुवात झाली. यामध्ये ऋषी सुनक हे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले होते.