कुडरूवाडी: के.एन.भिसे कॉलेजच्या वतीने छत्रपती शिवराज व्यायाम संकुलावर सोलापूर विद्यापीठांतर्गत आयोजित महाविद्यालयीन कुस्ती स्पध्रेत 125 किलो वजनी गटात मंगळवेढय़ातील संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थी ऋषिकेश आरकिले तर मुलींमध्ये 75 किलो वजनीगटात सोलापूरच्या एलबीपी महाविद्यालयाची रार्जशी कांबळे हीने बाजी मारली़या स्पध्रेचे उद्घाटन माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते झाले. ़यावेळी कुस्ती सम्राट अस्लम काझी, बाळासाहेब भिसे, वस्ताद वामनभाऊ उबाळे, प्राचार्य एऩ आऱ राजमाने, प्रा. किरण चोकाककर, डॉ. आर. आर. पाटील आदी उपस्थित होते. यासाठी स्पर्धा सचिव प्रा.पी. आय. तांबिले, प्रा.पी.एन. होनमुटे, प्रा. मकरंद भुजबळ, प्रा.एस.व्ही. मोरे, प्रा.बी.सी. मोहिते यांनी पर्शिम घेतले. सूत्रसंचालन प्रा.बी.बी. बस्के आभार प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांनी मानले. (वार्ताहर)स्पध्रेचा निकाल पुढीलप्रमाणे..4मुले - 57 किलो: संदीप बिराजदार (मंद्रुप), 61 किलो: मुकुंद वाडकर (डी.बी.एफ.सोलापूर), 65 किलो: शिवाजी भोसले (पंढरपूर), 70 किलो: आशिष वावरे (नातेपुते), 74 किलो: किरण अनुसे (वेळापूर), 86 किलो: किरण कदम (मोडनिंब), 97 किलो: प्रशा नरुटे (नातेपुते), 125 किलो: ऋषिकेश आरकिले (मंगळवेढा)़4मुली- 48 किलो: वर्षा बिचकुले (नातेपुते), 53 किलो: सीमादेवी शेळके (पंढरपूर), 55 किलो: धनर्शी डोंगरे (विज्ञान सांगोला), 58 किलो: मनीषा राठोड (एलबीपी सोलापूर), 60 किलो: काजल नलावडे (विज्ञान सांगोला), 63 किलो: सुलताना पठाण (विज्ञान सांगोला), 75 किलो :रार्जशी कांबळे (एलबीपी सोलापूर)़
ऋषिकेश आरकिले, रार्जशी कांबळे प्रथम
By admin | Published: December 19, 2014 12:29 AM