नवी दिल्ली/मुंबई : ओखी चक्रीवादळात तामिळनाडू आणि केरळातील ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार बेपत्ता आहेत. वेंगुर्ले बंदरात उभ्या केलेल्या सात होड्या समुद्रात बुडाल्या. या वादळाचा प्रभाव कमी झाला असून ते गुजरातकडे सरकले असल्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा धोका टळला आहे.मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी पावसाच्या सरी कोसळल्या. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाºयावर बुधवारी ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.बचाव पथकाने ५५६ मच्छीमारांना वाचविले आहे. तामिळनाडू व केरळचे बोटींसह वाहून गेलेले ८०९ मच्छीमार किनाºयावर पोहोचले. लक्षद्वीपमधील ३३ पर्यटक सुरक्षित आहेत. चक्रीवादळाने गुजरात, दमण, दीव व दादरा नगर हवेली येथे मोठ्या नुकसानाची शक्यता आहे.लक्षद्वीपमध्ये मदतओखीमुळे प्रभावित झालेल्या लक्षद्वीपमधील नागरिकांना भारतीय नौदलाने मदतीचा हात दिला. नौदलाने जहाजातून जीवनावश्यक साहित्य कवारट्टी आणि कल्पनी बेटावरील नागरिकांना पोहोचविले.राज्यातील शेतकरी चिंतेतओखी वादळामुळे राज्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीसह वर्सोवा चौपाटीवर उसळलेल्या समुद्राच्या लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. मात्र मुंबईपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओखी वादळाने दक्षिण गुजरातकडे आगेकूच केल्याने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला.पूर्वमध्य अरबी समुद्रावर आलेले ओखी चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी पावसामुळे समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे शक्यतो समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.अफवांचाही पाऊस!आज दिवसभर अफवांचा पाऊसहीजोरदार होता. चक्रीवादळामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गारा पडल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता, तर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक) आणि पेडर रोड खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवल्याची अफवा मंगळवारी व्हायरल झाली होती.नेत्यांच्या सभा रद्द : चक्रीवादळ सुरतपासून ३९० किमी अंतरावर असून वादळामुळे गुजरातमध्ये अनेक नेत्यांच्या प्रचारसभा रद्द झाल्या आहेत.
‘ओखी’चा धोका टळला, आतापर्यंत ३९ बळी; १६७ मच्छीमार बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 5:07 AM