नवी दिल्ली: कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या देशातील नागरिकांना काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.पिवळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांना सुस्ती येते. भूक कमी लागते किंवा भूकच लागत नाही. या रुग्णांच्या वजनात घट होते. गेल्या काही दिवसांत पिवळ्या बुरशीचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे आढळून आला आहे. परिसरातील अस्वच्छ वातावरणामुळे पिवळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्या आजारावर अॅम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन सध्या एकमेव प्रभावी औषध आहे.
पिवळ्या बुरशीच्या संसर्गाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 8:33 AM