तिरुअनंतपुरम : पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेला हा अभ्यास करण्याचा आदेश दिला आहे. परिषदेने या प्रश्नावर उत्तरेही सुचवावीत, असेही विजयन यांनी सांगितले आहे. तापमान वाढत असून, नद्यांच्या पाण्याची पातळी खाली गेली असून, झपाट्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत व जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे, तसेच गांडूळ मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. या सगळ्या घटना केरळमध्ये गेल्या महिन्यात विध्वंसकारक ठरलेल्या पुराच्या परिस्थितीनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काळजीच्या ठरल्या आहेत. पुराने वायनाड जिल्ह्याला मोठा फटका बसला. हा जिल्हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात गांडूळ फार मोठ्या संख्येत नष्ट झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी काळजी वाटत आहे. जमीन वेगाने कोरडी पडल्यामुळे व जमिनीच्या रचनेत बदल झाल्याचा परिणाम गांडूळ नष्ट होण्यात झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.>तज्ज्ञांनी केले दुष्काळाचे भाकीतपेरियार, भारतपुझ्झा, पॅम्पा आणि कबानीसह अनेक नद्या कोरड्या पडत आहेत. अनेक जिल्ह्यांत विहिरी कोरड्या पडून कोसळत आहेत. राज्यात पुराने अनेक भागांत त्यांच्या स्वाभाविक रचनेत बदल घडवला व इडुक्की आणि वायानंदच्या विशेषत: डोंगराळ भागात एकेक किलोमीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दरडीही कोसळल्या आहेत. पुरानंतर राज्याच्या दक्षिण भागातील अनेक जिल्ह्यांत तज्ज्ञांनी दुष्काळी परिस्थितीचे भाकीत केले आहे.
पूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:25 AM