अखेर ठरले! बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपाचे घोडे गंगेत न्हाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:01 PM2019-03-29T12:01:05+5:302019-03-29T12:10:13+5:30

सर्वच घटकपक्षांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे खोळंबलेले बिहारमधील महाआघातील जागावाटपाचे घोडे अखेर आज गंगेत न्हाले.

RJD to contest on 19 seats & Congress to contest on 9 seats in Bihar - Tejashwi Yadav | अखेर ठरले! बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपाचे घोडे गंगेत न्हाले

अखेर ठरले! बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपाचे घोडे गंगेत न्हाले

googlenewsNext

पाटणा - सर्वच घटकपक्षांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे खोळंबलेले बिहारमधील महाआघातील जागावाटपाचे घोडे अखेर आज गंगेत न्हाले. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या खलबतांनंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. ठरलेल्या जागावाटपानुसार बिहारमध्ये राजद 19, काँग्रेस 9 आणि आरएलएसपी 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे. हम आणि व्हीआयपी पक्षांना प्रत्येकी तीन तर सीपीआय (माले) पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे. 

बिहामधील महाआघाडीतील जागावाटपाची घोषणा करताना तेजस्वी यादव यांनी सांगितले की, ''राष्ट्रीय जनता दल (राजद) बिहारमधील 19 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जागावाटपामध्ये भागलपूर, बांका, मधेपुरा आणि दरभंगा हे मतदारसंघ राजदच्या वाट्याला आले आहेत. तर काँग्रेस 9 जागांवर निवडणूक लढणार आहे. तसेच जागावाटपात कळीचा विषय ठरलेला पाटणा साहिब मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहे. महाआघाडीत सहभागी झालेल्या आरएलएसपीलाही 5 जागा देण्यात आल्या आहेत.'' 




 दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद यादव हे मधेपुरा येथून निवडणूक लढवतील. तर सर्फराज आलम हे अररिया आणि मिसा भारती पाटलीपुत्र येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी माहितीही तेजस्वी यादव यांनी दिली. जागावाटपामध्ये पाटणा साहिब मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने शत्रुघ्न सिन्हा यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  


महाआघाडीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत. 


 

Web Title: RJD to contest on 19 seats & Congress to contest on 9 seats in Bihar - Tejashwi Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.