पाटणा - सर्वच घटकपक्षांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे खोळंबलेले बिहारमधील महाआघातील जागावाटपाचे घोडे अखेर आज गंगेत न्हाले. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या खलबतांनंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. ठरलेल्या जागावाटपानुसार बिहारमध्ये राजद 19, काँग्रेस 9 आणि आरएलएसपी 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे. हम आणि व्हीआयपी पक्षांना प्रत्येकी तीन तर सीपीआय (माले) पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे. बिहामधील महाआघाडीतील जागावाटपाची घोषणा करताना तेजस्वी यादव यांनी सांगितले की, ''राष्ट्रीय जनता दल (राजद) बिहारमधील 19 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जागावाटपामध्ये भागलपूर, बांका, मधेपुरा आणि दरभंगा हे मतदारसंघ राजदच्या वाट्याला आले आहेत. तर काँग्रेस 9 जागांवर निवडणूक लढणार आहे. तसेच जागावाटपात कळीचा विषय ठरलेला पाटणा साहिब मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहे. महाआघाडीत सहभागी झालेल्या आरएलएसपीलाही 5 जागा देण्यात आल्या आहेत.''
महाआघाडीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत.