बिहारच्या ब्रह्मपूरचे आमदार शंभू यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते साड्या वाटप करताना महिलांशी गैरवर्तन करताना दिसत आहे. रागाच्या भरात त्यांनी एका महिलेच्या डोक्यावर साडीने मारलं. आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. साडी वाटप कार्यक्रमादरम्यान ही संतापजनक घटना घडली. या कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनीही सहभाग घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शंभू यादव महिलांना साड्या वाटप करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. साड्या वाटताना त्यांचं वर्तन योग्य नव्हतं, असा आरोप लोकांनी केला आहे. रागाच्या भरात त्यांनी एका महिलेच्या डोक्यावर साडीने मारलं. साडी वितरण कार्यक्रमात सुमारे १० हजार महिलांना साड्या वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
महिलांची मोठी गर्दी
साडी घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी इतकी होती की चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान अनेक महिला एकमेकांवर प़डल्या. यानंतर आरजेडी कार्यकर्त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यांनी महिलांना रांगेत उभे केले. या घटनेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. साडी वाटप ही निवडणूक जिंकण्याची रणनीती आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आमदार साड्या वाटत आहेत असं म्हटलं.
महिलांसोबत साडी वाटप करतान गैरवर्तन
आमदार शंभू यादव यांनी हा आरोप खोटा असल्याचं सांगितलं आहे. गरीब महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती दिली. आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान, आमदाराचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात ते महिलांना साड्या वाटण्याऐवजी त्यांच्यावर फेकताना दिसत आहे. महिलांसोबत साडी वाटप करतान गैरवर्तन केल्याने लोक संतापले आहेत.