बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) आमदार शंभूनाथ यादव यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने बुधवारी छापे टाकले. शंभूनाथ यादव हे बहरामपूरचे आमदार आहेत आणि ते आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात.
आयकर विभागाचा हा छापा टॅक्स चोरीच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शंभूनाथ यादव यांच्यावर याबाबत आरोप आहे. याची माहिती आयकर विभागाला देण्यास त्यांनी नकार दिला होता. ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यामध्ये बहरामपूरच्या चक्की भागातील त्याच्या घराचाही समावेश आहे.
भाजपा घाबरली आहे आणि ही छापेमारी त्याचा पुरावा आहे, असा दावा आरजेडीने केला आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, भाजपाने आरजेडी नेत्यांविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा वापर केला. हे स्पष्ट आहे की केंद्र सरकार आरजेडी आणि त्यांच्या नेत्यांना घाबरत आहे, म्हणूनच ते आमच्या विरोधात केंद्रीय एजन्सी वापरत आहेत.