घोघा/दाहेज (गुजरात) : गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला असून, रविवारी त्यांनी सौराष्ट्र ला दक्षिण गुजरातशी जलमार्गाने जोडणा-या ‘रोल आॅन-रोल आॅफ’ या आपल्या स्वप्नातील नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी भावनगरच्या शंभर दृष्टिहीन मुलांसोबत घोघा ते दाहेजपर्यंत नौकेतून सैरही केली.>काय आहेरो-रो सर्व्हिस...घोघा ते दाहेजदरम्यानच्या ६५० कोटी रुपये खर्चाच्या ‘रो-रो’ नौका सेवेमुळे प्रवासासोबत वाहन आणि मालाची वाहतूकही करता येणार आहे.>त्या राज्यांना केंद्रछदामही देणार नाहीकेंद्र सरकारचा सर्व पैसा लोककल्याणासाठी खर्च केला जाईल व विकासाला विरोध करणाºया राज्यांना केंद्राकडून एक छदामही दिला जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे दिला.>वेळ वाचणारसौराष्टÑ आणि दक्षिण गुजरातदरम्यान रस्त्याने प्रवास करण्यासाठी दहा तास लागतात. दाहेज ते घोघादरम्यानचे अंतर रस्तेमार्गे ३१० किलोमीटर आहे. या जलमार्गाने हे अंतर ३१ किलोमीटरवर येईल आणि वेळही कमी लागेल.>150 मोठ्या वाहनांची वाहतूक करता येणार>1000 लोक एकाच वेळी बोटीतून प्रवास करू शकतील>600 रुपये सध्या या नौका सेवेचे भाडे आहे.
मोदींच्या स्वप्नातील रो-रो सेवा अखेर त्यांच्याच हस्ते सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 7:14 AM