मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या कांझावाला सारख्या भीषण रस्ते अपघाताने जबलपूरच्या गाडा पोलीस स्टेशन अंतर्गत अंधमुक बायपास येथे रात्री उशिरा एका वैद्यकीय विद्यार्थिनीचा जीव घेतला. ट्रकचालकाने विद्यार्थिनीला ५० मीटरपेक्षा जास्त अंतरावर फरफेटत नेलं आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या वेळी या विद्यार्थीनीच्या दुचाकीवर एक विद्यार्थीही होता, जो गंभीर जखमी झाला असून त्याला जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जिथे विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी माहिती मिळताच अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि घटनेच्या आजूबाजूला आणि टोलनाक्यावरील कॅमेऱ्यांमध्ये आरोपी ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गढा पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. दुसरीकडे, मृत विद्यार्थिनी रुबी ठाकूर ही शहडोल येथील रहिवासी आहे. जी रात्री दहाच्या सुमारास सहकारी विद्यार्थी सौरभ ओझासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून सर्व्हिस लाईनमार्गे चौकाकडे येत होते. तिलवाड्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. त्यानंतर सहकारी विद्यार्थी सौरभ हा दुसऱ्या बाजूला पडला. त्याचवेळी विद्यार्थिनी दुचाकीसह ट्रकच्या मागील चाकात अडकली.
ट्रकने विद्यार्थिनीला ५० मीटरपेक्षा जास्त अंतरावर फरफटत नेलंघटनेच्या वेळी उपस्थित लोकांनी ट्रकचालकाला आरडाओरडा करुन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रकचालकाने भरधाव वेगाने विद्यार्थिनीला ५० मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत फरफटत नेलं. स्थानिक लोकांनी रुग्णवाहिका बोलावली तसंच पोलिसांना घटनेची माहिती दिली. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. जिथे जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत.