ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - देशाची राजधानी दिल्ली खरतर सर्व सोयी-सुविधांनी युक्त असली पाहिजे पण दिल्लीमध्येच पाण्यापासून शाळेपर्यंत अनेक प्रश्न आहेत. त्यात वाहतूक कोंडी एक मुख्य समस्या आहे. दिल्लीमध्ये वाहनांची संख्या इतकी आहे की, त्यातून निर्माण होणा-या वायू प्रदूषणामुळे मागच्यावर्षी दिल्ली सरकारला सम-विषम योजना लागू करावी लागली होती.
आता विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचा (सीएसई) दिल्लीच्या वाहतुककोंडी संबंधी एक अहवाल समोर आला आहे. यातून जो निष्कर्ष निघलाय त्यानुसार दिल्लीच्या वाहतुकीपेक्षा उसेन बोल्टचा वेग जास्त आहे. गर्दीच्या वेळी दिल्लीच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा वेग ताशी 26 कि.मी. असतो. खरतर हा वेग 40 ते 55 कि.मी. असला पाहिजे. गर्दी नसते त्यावेळीही वाहतुकीची फारशी चांगली स्थिती नाही.
आणखी वाचा
गर्दी नसताना वाहतुकीचा वेग ताशी 27 कि.मी. असतो. वाहतुकीच्या या वेगाची जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टशी तुलना केली तर, त्याचा सरासरी वेग ताशी 37 ते 38 कि.मी. आहे. बोल्टचा टॉप स्पीड ताशी 40 कि.मी. आहे. गर्दीच्या वेळी दिल्लीच्या रस्त्यावर कोण लॅम्बोर्गिनी कार चालवत असेल तर, त्यावेळी उसेन बोल्टचा वेग त्या कारपेक्षा जास्त असेल.
सीएसईने जून महिन्यातील दिल्लीच्या रस्त्यावरील वाहतुकीचा अभ्यास करुन हा अहवाल बनवला आहे. सीएसईने दिल्ली-एनसीआर भागातील 13 महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास केला आहे.