भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:05 PM2019-05-24T12:05:04+5:302019-05-24T12:05:19+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते.

The road to the house that showed seven 'rebel' MPs in the BJP | भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता

भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता

Next

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत एनडीएला लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. जनतेने मतपेटीतून स्पष्ट केले की, मोदींना हटविणे सोपं नाहीच. परंतु, त्याचवेळी भाजपशी बंडोखोरी करून विरोधकांना सामील झालेल्या सात खासदारांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे.

या खासदारांना २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत जबरदस्त विजय मिळवला होता. मात्र २०१९ येईपर्यंत या खासदारांना भाजपमधील वातावरण भावले नाही. त्यानंतर या नेत्यांनी पक्षांतर करून २०१९ लोकसभा निवडणूक दुसऱ्या पक्षांकडून लढवली. परंतु, यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

शत्रुघ्न सिन्हा

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सिन्हा यांचा पराभव केला.

किर्ती आजाद

काँग्रेस उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आजाद धनबाद मतदार संघातून पराभूत झाले. या मतदार संघातून पीएन सिंह यांनी बाजी मारली. २०१४ मध्ये दरभंगा मतदार संघातून किर्ती आजाग भाजपकडून निवडून आले होते. याचवर्षी किर्ती आजाद यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अशोक कुमार दोहरे

२०१४ मध्ये इटावा मतदार संघातून अशोक कुमार दोहरे यांनी विजय मिळवला होता. मात्र काही दिवसानंतर त्यांनी भाजपविरुद्धच शड्डू ठोकला होता. अखेरीस त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळी इटावा मतदार संघातून दोहरे यांचा पराभव झाला.

नाना पटोले

२०१४ लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघात भाजपला विजय मिळवून देणारे नाना पटोले यांनी भाजपसोबत बंडखोरी केली. मात्र यावेळी नागपूर मतदार संघातून नितीन गडकरी यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

सावित्री बाई फुले

भाजपसोबत बंडखोरी करून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सावित्री बाई फुले यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांनी काँग्रेसकडून बहराइच मतदार संघातून निवडणूक लढवली होती. भाजपकडून या मतदार संघातून अक्षयबर लाल यांना तिकीट देण्यात आले होते. त्यांचा विजय झाला.

शाम चरण गुप्ता

उत्तर प्रदेशातील बांदा लोकसभा मतदार संघातून सपा-बसपा-आरएलडी युतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शाम चरण गुप्ता यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच शाम चरण गुप्ता यांनी भाजपला अलविदा केला होता. २०१४ मध्ये ते इलाहाबादमधून खासदार होते.

मानवेंद्र सिंह

मानवेंद्र सिंह काही दिवसांपूर्वीच भाजपसोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. काँग्रेने मानवेंद्र सिंह यांना बाडमेर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. मात्र भाजपच्या कैलाश चौधरी यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Web Title: The road to the house that showed seven 'rebel' MPs in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.