नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात सहभागी अल्पवयीन मुलगा लवकरच सुधारगृहातून बाहेर येणार आहे. त्याची तीन वर्षांची शिक्षा पुढील महिन्यात संपत असून त्याला प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सरकारने चालविले आहे.सुधारगृहातून बाहेर येताच लोक आपल्याला ठेचून मारतील ही भीती त्याला सतावत आहे. १६ डिसेंबर २०१२ रोजी नराधमांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिच्यावर क्रूर हल्ला केला होता. काही दिवसांतच ती मृत्युमुखी पडल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त झाला होता. या प्रकरणातील किशोरवयीन गुन्हेगाराची शिक्षा १५ डिसेंबर रोजी संपणार असून त्याला एक आठवडा आधीच मुक्त करण्याचा विचार आहे.हा मुलगा धार्मिक बनला असून त्याने दाढी वाढविली आहे. तो दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो. त्याला बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मुलासोबत ठेवण्यात आल्यानंतर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लक्ष वेधले होते.
निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन मुक्ततेच्या वाटेवर
By admin | Published: November 01, 2015 11:49 PM