नवी दिल्ली - सुरक्षित वाहतुकीसाठी कटिबद्ध असलेल्या होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय स्तरावर रस्ते सुरक्षा सप्ताह पाळण्यात येत आहे. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने विनाअपघात वाहतुकीसाठी चालविलेल्या प्रयत्नांचे महत्त्व या सप्ताहामध्ये लोकांच्या मनावर ठसविण्यात येत आहे.दुचाकी चालविताना हेल्मेट वापरा, असा संदेशही होंडातर्फे देण्यात येत आहे. हा रस्ते सुरक्षा सप्ताह यशस्वी करण्यासाठी होंडाचे ९८६ डीलर, ४ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, १६ विभागीय कार्यालये, ४ प्रादेशिक कार्यालये येथील कर्मचारीवर्ग अथक परिश्रम घेत आहे. या सप्ताहानिमित्त कंपनीने ठाणे, येवले यासह १३ ठिकाणी असलेल्या आपल्या ट्रॅफिक पार्कमध्ये विशेष कार्यक्रमांचेही आयोजन केले.पुण्यात कार्यशाळाजयपूरमध्ये रस्ते सुरक्षाविषयक तीन दिवसांच्या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. तर पुण्यात महाविद्यालयीन युवकांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व कळण्यासाठी सेफ सायकलिंग कार्यशाळा पार पडली. आम्ही वाहननिर्मिती करताना प्रत्येकासाठी सुरक्षित प्रवास हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवतो, असे होंडा मोटारसायकल व स्कूटर इंडियाचे ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी सांगितले. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, स्कूलबसच्या चालकांसाठी कार्यशाळा, ९ ते १२ वयोगटातील मुलांसाठी सायकलिंगचे प्रशिक्षण शिबिर असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)
होंडातर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह, देशभरात जनजागृती मोही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 5:23 AM