Helmate Man of India : लखनौ एक्स्प्रेस वेवर एक माणूस हेल्मेट घालून कार चालवत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राघवेंद्र कुमार असे या व्यक्तीचे नाव असून, ते सोशल मीडियावर 'हेल्मेट मॅन ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध आहे. राघवेंद्र यांचे यापूर्वीही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात ते लोकांना मोफत हेल्मेट देताना दिसत आहेत. अपघातात आपला एक मित्र गमावल्यानंतर राघवेंद्र यांनी लोकांना मोफत हेल्मेट वाटपाची मोहीम सुरू केली.
राघवेंद्र यांचा नुकताच आलेला व्हिडिओ चर्चेत आहे. त्यात ते हेल्मेट घालून कार चालवताना दिसत आहे. राघवेंद्र यांनीच हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि कॅप्शन दिले की, 'माझ्या कारचा वेग 100 च्या वर जात नाही, पण लखनऊ एक्सप्रेसवेवर एका व्यक्तीने cne ओव्हरटेक केले तेव्हा मी थक्क झालो. हेल्मेटशिवाय तो गाडी चालवत होता आणि त्याचा वेग आमच्यापेक्षा जास्त होता. त्याला हेल्मेट देण्यासाठी मला कार 100 च्या वर चालवावी लागली, शेवटी त्याला पकडले.'
हेल्मेट न घातल्यामुळे राघवेंद्र यांने एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वाराला थांबवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यांनी या व्यक्तीला सांगितले की, ते बऱ्याच वेळापासून त्याचा पाठलाग करत आहेत. यानंतर ते दुचाकीस्वाराला हेल्मेट देतात आणि हे घालूनच गाडी चालवण्यास सांगतात. राघवेंद्र व्हिडीओमध्ये म्हणतात की, ''माझ्या कारच्या मागे एक मेसेज लिहिलेला आहे. 'यमराज ने भेजा है बचाने के लिए...ऊपर जगह नहीं है जाने के लिए.' यावेळी राजवेंद्र त्या तरुणाला हेल्मेट भेट म्हणून देतात.
नितीन गडकरींनी कौतुक केले आहे
राघवेंद्र कुमार सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. हेल्मेट मॅन ऑफ इंडिया या युजरनेमसह ते ट्विटरवर सक्रिय आहे. ट्विटरवर त्यांचे 5 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर, यूट्यूबवर 3 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ते अनेकदा रस्त्यावरील लोकांना रस्ता सुरक्षेबाबत जागरुक करतात. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली आहे. यादरम्यान नितीन गडकरी राघवेंद्र कुमार यांचे खूप कौतुक केले.