शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

केरळमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याद्वारे रस्तेबांधणी; शुचित्व सागरम योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 4:30 AM

समुद्रातील प्लॅस्टिक कच-याचा निचरा करणे वा त्याची विल्हेवाट लावणे ही मोठ्या शहरांची समस्या बनली असताना, केरळ सरकारने या कच-याचा वापर रस्तेबांधणीसाठी करण्यास सुरुवात केली आहे.

तिरुवनंतपूरम : समुद्रातील प्लॅस्टिक कच-याचा निचरा करणे वा त्याची विल्हेवाट लावणे ही मोठ्या शहरांची समस्या बनली असताना, केरळ सरकारने या कच-याचा वापर रस्तेबांधणीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी केरळ सरकारने विशेष योजनाच आखली आहे.महाराष्ट्रात मुंबईसह कोकणातील समुद्रात व किनाºयावर प्रचंड प्लॅस्टिक कचरा कायम पडलेला असतो. समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाºया मासेमारांच्या जाळ्यात हे प्लॅस्टिक अडकते आणि त्यामुळे जाळ्याही फाटतात, तसेच या प्लॅस्टिकमुळे मासेही मोठ्या प्रमाणात मरतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही रस्तेबांधणीसाठी या प्लॅस्टिकचा वापर करण्याचामानस बोलून दाखविला होता,पण केरळने त्यासाठी योजनाचतयार केली आहे.साधारणपणे १ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी १० लाख प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. आपण सध्या इतका प्लॅस्टिकचा वापर करीत आहोतकी, इतके प्लॅस्टिक सहजच उपलब्ध होत आहे.शिवाय डांबराच्या रस्त्यांपेक्षा प्लॅस्टिक वापरून रस्तेबांधणीसाठी साधारणपणे ८ टक्के कमी खर्च येतो. एका अंदाजानुसार प्रत्येक भारतीय वर्षाला सुमारे ११ किलो प्लॅस्टिक वापरतो आणि फेकतो. भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे, हे लक्षात घेता, रस्त्यांसाठी भरपूर प्लॅस्टिक मिळू शकेल. (वृत्तसंस्था)शुचित्व सागरम (समुद्र स्वच्छ करणे) असे या योजनेचे नाव आहे. केरळच्या मत्स्यसंवर्धनमंत्री जे. मर्सीकुट्टी अम्मा यांनी सांगितले की, मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या प्लॅस्टिकचे वर्गीकरण केले जाईल. त्या प्लॅस्टिकचे अतिशय बारीक तुकडे केले जातील आणि त्यांचा वापर रस्तेबांधणीसाठी केला जाईल. अस्फाल्टला पर्याय म्हणून या प्लॅस्टिकचा वापर करणे सहज शक्य आहे.मर्सीकुट्टी अम्मा यांनी हेही स्पष्ट केले की,ही योजना प्रत्यक्ष राबविणेही आम्ही सुरू केले आहे. कचºयाचे वर्गीकरण करणे व त्याचे बारीक तुकडे करणे या कामांमुळे अनेकांना रोजगारही मिळाला आहे. डांबर ५0 अंश सेल्शिअस तापमानाला वितळू लागते, पण प्लॅस्टिक वितळण्यासाठी मात्र ६५ अंश तापमानाची गरज असते. म्हणजेच ते डांबराप्रमाणे लवकर वितळत नाही आणि त्यामुळे रस्ते अधिक काळ टिकतात.अर्थात मुळात समुद्रातील प्लॅस्टिक संपविणे, हा यामागील हेतू आहे. केरळला प्रचंड समुद्र व किनारा लाभलेला आहे. त्यामुळे शुचित्व सागरम योजनेद्वारे आम्ही कमी खर्चात मोठ्या प्रमाणात रस्तेबांधणी करू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राज्यातही हे व्हावे सुरूमहाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. ती पूर्ण यशस्वी होते का, हे कळण्यास अवधी लागेल. तरीही समुद्रातील प्लॅस्टिकची समस्या राज्यातही आहे. रस्तेबांधणी प्रत्यक्ष सुरू झाली, तर चांगले रस्ते बांधले जातील व खर्चही कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :keralकेरळ