नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून आजही चौकशी केली जाणार आहे. रॉबर्ट वाड्रा ईडी ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत. वाड्रा यांना आज 40 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. बुधवारीदेखील (6 फेब्रुवारी) ईडीनं वाड्रा यांची तब्बल 6 तास कसून चौकशी केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीनं वाड्रा यांना त्यांच्या लंडनमधील मालमत्ता आणि काही ईमेल्ससंदर्भात माहिती विचारली. शिवाय, संजय भंडारी नावाच्या व्यावसायिकासोबत त्यांच्या असलेल्या नातेसंबंधांसंदर्भातही ईडीनं चौकशी केली. वाड्रा यांना दिल्लीतील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, मात्र चौकशीसाठी सहकार्य करण्याचे कठोर निर्देशही दिले आहेत.
पतीच्या बाजूनं ठामपणे उभी आहे - प्रियंका गांधीदुसरीकडे, प्रियंका गांधी यांनी बुधवारी (6 फेब्रुवारी) काँग्रेस मुख्यालयात जाऊन सरचिटणीस पदाची सूत्र हाती घेतली. पक्षाने सोपवलेली जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्या पती वाड्रा यांच्यासोबत ईडी ऑफिसपर्यंत गेल्या होत्या. 'वाड्रा माझे पती आहेत आणि मी त्यांच्या बाजूने ठामपणे उभी आहे', अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी दिली.