Hathras Gangrape: हाथरसमधील पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियंका गांधींसाठी केलं भावनिक ट्विट
By मुकेश चव्हाण | Published: October 4, 2020 04:40 PM2020-10-04T16:40:33+5:302020-10-04T16:51:35+5:30
उत्तर प्रदेश पोलिसांच्या या गैरवर्तनानंतर प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावूक ट्विट केले आहे.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहित बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाची काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोत एक पोलीस कर्मचारी प्रियांका गांधी यांच्या कपड्यांना पकडून खेचताना दिसून येत आहे. प्रियंका गांधींचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या गैरवर्तनानंतर प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावूक ट्विट केले आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियंका गांधींसाठी एक भावनिक ट्विट केले आहे. प्रियंका तुझा अभिमान आहे. देशातल्या दु:खी लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच ऐकमेव मार्ग आहे. मला आणि सर्व कुटुंबीयांना तुझी आणि देशातल्या लोकांची काळजी वाटते. पण असे अत्याचार रोखण्यासाठी आघाडीवरच उभे राहूनच लढण्याची गरज असल्याचे रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे.
Proud of you P...this is the only way to find justice for the suffering people in our country.
— Robert Vadra (@irobertvadra) October 4, 2020
I and the entire family worry about you & people of our country do too, but we have to be front -footed to stop all the atrocities on the poor and keep fighting for the people🙏 pic.twitter.com/eqn68oEc4y
दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवण्यात आले होते. याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. मात्र शनिवारी पुन्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते.
यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते देखील हाथरसकडे निघाले होते. मात्र दिल्ली - नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापटी सुरू असताना प्रियांका गांधी गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी पोलिसांना आपल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जपासून रोखण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या धुमश्चक्रीनंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासहीत केवळ पाच नेत्यांना हाथरसकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला.
Only love can bring any semblance of peace to those who are grieving.#SatyagrahaForOurDaughterspic.twitter.com/sL2Db0x5UN
— Congress (@INCIndia) October 3, 2020