Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 02:27 PM2021-04-02T14:27:19+5:302021-04-02T14:29:48+5:30

प्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती. प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये

robert vadra tests corona positive congress priyanka gandhi cancels her-assam election tour | Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

Next
ठळक मुद्देप्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती.प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये

Robert Vadra Corona Positive: गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बड्या व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दरम्यान, उद्योजक आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत याची माहिती दिली. तसंच आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आपले पुढील दौरे रद्द केले आहेत.

"नुकतंच मला कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यानं आसाम दौरा रद्द करावा लागत आहे. माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस मी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या असुविधेसाठी मी क्षमा मागते. मी काँग्रेसच्या विजयाची प्रार्थना करते," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.



सध्या काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहे. प्रियंका गांधी आज आसाममध्ये तीन सभांना संबोधित करणार होत्या. दुपारी गोलपारा पूर्व. त्यानंतर गोलकगंज आणि त्यानंतर सरुखेत्री या ठिकाणी त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Web Title: robert vadra tests corona positive congress priyanka gandhi cancels her-assam election tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.