Robert Vadra Corona Positive: गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बड्या व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दरम्यान, उद्योजक आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत याची माहिती दिली. तसंच आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आपले पुढील दौरे रद्द केले आहेत."नुकतंच मला कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यानं आसाम दौरा रद्द करावा लागत आहे. माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस मी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या असुविधेसाठी मी क्षमा मागते. मी काँग्रेसच्या विजयाची प्रार्थना करते," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 14:29 IST
प्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती. प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये
Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द
ठळक मुद्देप्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती.प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये