शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

रोहित खंडेलवाल ठरला यंदाचा ‘मिस्टर वर्ल्ड’!

By admin | Published: July 21, 2016 4:51 AM

‘हैदराबाद शहर सोडल्यानंतर हातात केवळ दोन बॅग घेऊन मी स्वप्नांना पंखांचे बळ देण्यासाठी मुंबईत आलो.

नवी दिल्ली : ‘हैदराबाद शहर सोडल्यानंतर हातात केवळ दोन बॅग घेऊन मी स्वप्नांना पंखांचे बळ देण्यासाठी मुंबईत आलो. क्षमतेच्या बाहेर जाऊन परिश्रम करण्यावर माझा गाढ विश्वास आहे. लक्ष्य गाठण्यास मी कठोर परिश्रम घेतले,’ असे ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’ चा किताब पटकावणारा रोहित खंडेलवाल याने म्हटले आहे.रोहितने लंडनहून ‘लोकमत’शी फोनवर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. मॉडेल, अभिनेता, टीव्ही कलावंत आणि २०१५ चा मिस्टर इंडिया किताब पटकावणारा २७ वर्षीय रोहित आता ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’ने सन्मानित करण्यात आलेला पहिला आशियन ठरला. आपल्या चाहत्यांना दिलेल्या संदेशात रोहित म्हणतो, ‘काहीतरी चांगले करा आणि आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक दिवस हा नवा दिवस समजून जगा.’ ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’चा किताब जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याबद्दल कसे वाटते, या प्रश्नाच्या उत्तरात रोहित म्हणाला, हे सारे काही मला स्वप्नवत वाटते आणि त्या भावनेतून मी अद्याप बाहेर आलेलो नाही. मी अगदी साधासुधा माणूस आहे आणि प्रदीर्घ काळापासून कठोर परिश्रम घेत आहे. हा किताब मिळविताना मला मोठा अभिमान वाटतो आणि माझे हे यश कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरे करण्याकरिता लवकरात लवकर मी भारतात परतण्यासाठी आतूर आहे.रोहित सध्या लंडनमध्ये आहे. पुढच्या आठवड्यात तो मुंबईत परतेल. मुंबईत दोन दिवस घालविल्यानंतर तो हैदराबादला जाईल. तेथे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचे जंगी स्वागत करण्याचे ठरविले आहे.>आनंद गगनात मावेना!‘मी त्याच्या भेटीसाठी आतूर आहे. आम्ही त्याच्या जय्यत स्वागताची तयारी करीत आहोत. माझ्या मुलाकडून ही आनंदाची वार्ता कळाल्यापासून मला झोपही लागलेली नाही. - सुमनलता खंडेलवाल, रोहितची आई आपण जगाच्या सर्वोच्च शिखरावर असल्याचे वाटत आहे. त्याने देशाचा मान वाढविला आहे. रोहितच्या भव्य स्वागताची तयारी केली असून मुंबई, हैदराबाद विमानतळावरच आनंद साजरा करणार आहोत.-राहुल खंडेलवाल, रोहितचा भाऊ