सोनीपत:हरियाणातील सोनीपतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गणौर येथील शाळेचे छत कोसळून सुमारे 25 विद्यार्थी जखमी झाले असून, 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. ही धक्कादायक घटना सोनीपतच्या बायपास रोडवर असलेल्या जीवनानंद शाळेत घडली आहे. दरम्यान, गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रोहतक पीजीआयमध्ये तर इतर विद्यार्थ्यांना गणौर येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, शस्त्र आणि स्फोटकांसह 3 दहशतवादी अटक
शाळेचं छत कोसळलं तेव्हा वर्ग सुरू होते. या छत कोसळल्याच्या घटनेत विद्यार्थ्यांसह 3 मजूरही गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचं वृत्त मिळताच गणौर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, तपासही सुरू केला आहे. शाळेचं छत कोसळताच जखमी मुलांना तातडीने गणौर कम्युनिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना रोहतक पीजीआयमध्ये रेफर केलं.
'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं'-अजित पवार
दुरुस्तीदरम्यान छत कोसळलंमिळालेल्या माहितीनुसार, जीवनानंद शाळेचं छत कोसळलं, तेव्हा छतावर दुरुस्तीचं काम सुरू होतं. शाळेच्या तिसरीच्या वर्गावरील छतावर माती टाकली जात होते, यावेळी अचानक छत कोसळलं. या अपघातानंतर वर्गातील मुलं ढिगाऱ्याखाली अडकली गेली. तर, वरुन खाली पडल्यानं 3 मजूरही जखमी झाले.