शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Govt Scheme: २५ वर्ष वीज अगदी मोफत...बिनधास्त वापरा टीव्ही, फ्रीज; सरकारच्या 'या' स्क्रीमचा घ्या फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:57 PM

महागाईनं लोकांचं बजेट बिघडलं आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे.

नवी दिल्ली-

महागाईनं लोकांचं बजेट बिघडलं आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. पण तुमची इच्छा असेल तर एक जबरदस्त पद्धत वापरुन तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च कमी करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला एकदाच थोडासा खर्च करावा लागेल. पण यात तुम्हाला सरकारही मदत करेल. तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवावा लागेल. सोलर प्लेट वापरुन तुमच्या भरमसाट वीजबिलापासून मुक्ती प्राप्त करू शकता. 

सरकार देतंय सबसिडीघराच्या छतावर अगदी सोप्या पद्धतीनं सोलर पॅनल लावून तुम्ही वीज निर्मिती करू शकता. यासाठी सरकार देखील तुम्हाला मदत करतं. सरकार सोलर एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देतं. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनला लावू इच्छित असाल तर सरकार तुम्हाला सबसिडी देईल. पण त्याआधी तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला नेमकी किती वीजेची गरज आहे. यातून तुम्हाला कल्पना येईल की नेमकं किती क्षमतेचा सोलर पॅनलची गरज आहे. 

तुमच्या घरात जर २-३ पंखे, एक फ्रीज, ६-८ LED लाइट्स, एक पाण्याची मोटर आणि टेलिव्हिजन या गोष्टी असतील तर तुम्हाला दररोज ६-८ युनिट वीजेची गरज आहे. यासाठी तुम्हाला २ किलोवॅट सोलर पॅनलची गरज आहे. मोनोपार्क बायफिशिअल सोलर पॅनल सध्या नव्या टेक्नोलॉजीचा सोलर पॅनल आहे. यात पुढे आणि मागे दोन्ही बाजूनं पावर जनरेट होते. यासाठी चार सोलर पॅनल २ किलोवॅटसाठी पुरेसे आहेत. 

किती मिळते सबसिडी?भारतात सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जामंत्रालयानं सोलर रुफटॉप योजना सुरू केली आहे. तुम्ही डिस्कॉम पॅनलमध्ये सदस्य असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून आपल्या घरावर सोलर पॅनल बसवू शकता. त्यानंतर सबसिडीसाठी अर्ज करू शकता. तुम्ही जर ३ किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवत असाल तर सरकारकडून तुम्हाला ४० टक्के सबसिडी मिळेल. १० किलोवॅट सोलर पॅनलसाठी २० टक्क्यांपर्यंतची सबसिडी दिली जाते. 

खर्च किती?२ किलोवॅट क्षमतेचं सोलर पॅनल बसवायचं झालं तर याचा खर्च जवळपास १.२० लाख रुपये इतका येतो. पण सरकार त्यावर ४० टक्के सबसिडी देतं. त्यानुसार तुम्हाला फक्त ७२ हजार रुपये खर्च करावे लागतील. तर सरकारकडून ४८ हजार रुपयांची सबसिडी प्राप्त करता येईल. सोलर पॅनलची लाइफ २५ वर्षांची असते. त्यामुळे एकदा तुम्ही सोलर पॅनल बसवला की पुढील २५ वर्ष तुम्हाला नो टेन्शन.

टॅग्स :electricityवीज