शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 4:43 PM

यावर बोलताना माजी सभापती आणि भाजप नेते सीपी सिंह म्हणाले, मी नमाज पठणासाठी दिलेल्या रूमच्या विरोधात नाही, पण त्यांनी झारखंड विधानसभा परिसरात मंदिरही बांधायला हवे. मी तर अशीही मागणी करतो, की तेथे हनुमान मंदिर बांधायला हवे.

झारखंडच्या नवीन विधानसभा इमारतीत नमाज पठणासाठी एक स्वतंत्र रूम देण्यात आली आहे. आता यावरून वाद निर्माण झाला आहे. विधानसभा सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात, म्हणण्यात आले आहे, की नवीन विधानसभा इमारतीत नमाज पठणासाठी रूम नंबर TW-348 देण्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी जारी झालेला हा आदेश समोर येताच, आता वाद सुरू झाला आहे. जर नमाजसाठी रूम दिली गेली असेल, तर त्यात हनुमानजींचे मंदिरही बांधण्यात यायला हवे, अशी मागणी भाजपने केली आहे. (Room allotted for offering namaz in new assembly building in Jharkhand bjp said hanuman temple should also be built)यावर बोलताना माजी सभापती आणि भाजप नेते सीपी सिंह म्हणाले, मी नमाज पठणासाठी दिलेल्या रूमच्या विरोधात नाही, पण त्यांनी झारखंड विधानसभा परिसरात मंदिरही बांधायला हवे. मी तर अशीही मागणी करतो, की तेथे हनुमान मंदिर बांधायला हवे. जर सभापतींनी मंजुरी दिली, तर आम्ही स्वखर्चाने मंदिर बांधू शकतो. याशिवाय, लोकशाहीचे मंदिर हे लोकशाहीचे मंदिरच असायला हवे,असे भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी म्हटले आहे. नमाजसाठी स्वतंत्र रूम देणे चुकीचे आहे. आम्ही या निर्णयाविरोधात आहोत.

भाजपचे आमदार अनंत ओझा यांनी ट्विट करून यावर प्रश्न उपस्थित केला आहे, की हे काय सभापती महोदय, आता राज्यातील सर्वात मोठी पंचायतही तुष्टीकरणाला खत-पाणी घालण्याच्या मार्गावर? झारखंड विधानसभेत नमाज पठणासाठी स्वतंत्र रूम. झारखंडचे लोक सर्व पाहत आहेत. सर्वधर्म संभावाच्या मूळ आत्म्याला कलंकित करण्याचा निर्णय. 

दुसरीकडे, झारखंड भाजपचे प्रवक्ता प्रतुल शाह देव यांनी म्हटले आहे, की सर्व बाजूंनी अपयश आले, की लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा. झारखंडच्या इतिहासात प्रथमच विधानसभा भवनमध्ये नमाज पठणासाठी नमाज भवन बांधण्यात आले. तुष्टीकरणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. विधानसभेत बहुसंख्य समाजासाठी मंदिर किंवा प्रार्थना सभागृहाची तरतूद आहे का? 

टॅग्स :JharkhandझारखंडNamajनमाजMosqueमशिदBJPभाजपाHinduहिंदू