वहनोत्सवानिमित्ताने मंदिरावर रोशनाई श्रीराम रथोत्सव: ग्रामदैवत परिसरात विविध कामे सुरू
By admin | Published: October 29, 2016 1:04 AM
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंदिर परिसरात आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने जुने जळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंदिर परिसरात आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने जुने जळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळी आली की श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाची तयारी सुरू होते. श्रीराम रथोत्सवाचे हे १४४ वे वर्ष आहे. वारकरी संप्रदायाचे सद्गुरू कै. अप्पा महाराज यांनी शके १७९४ (१८७२) मध्ये रथोत्सवास प्रारंभ केला. रथोत्सवानिमित्ताने दरवर्षी वहने निघतात. ३१ ऑक्टोबरपासून वहनोत्सवास प्रारंभ होत आहे. रथोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक जळगावी येत असतात. तर ११ नोव्हेंबर रथोत्सव असतो. १४ नोव्हेंबरपर्यंत चालणार्या वहनोत्सवात रोज निघणार्या वहनावर काष्टशिल्पाच्या उत्कष्ट नमुना असलेले विविध देवतांची व प्राण्यांची वहने काढली जातात. वहनांच्या दर्शनासाठी प्रत्येक भागात गर्दी उसळत असते. दिवाळीचा खरा आनंद या निमित्ताने पहायला मिळतो. जय्यत तयारीवहनास रंगरंगोटी, साफसफाईची कामे आता अंतिम टप्प्यात आहे. या बरोबरच मंदिर परिसरातही साफसफाईची कामे सुरू झाली आहेत. तर मंदिरावर रोशणाईची कामेही सुरू झाली आहेत. मान्यवरांची असेल उपस्थितीपहिल्या वहनोत्सवानिमित्त ३१ रोजी पासूनच विविध कार्यक्रम सुरू होतील. पहाटे ५ वाजेपासून काकड आरती, पूजाअभिषेक, मंगलारती, हरिपाठ, सामुदायिक रामजप, तर सकाळी ९.३० वाजता निमखेडी शिवारातील श्रीराम मंदिरात पालखी जाईल. गिरणा नदीच्या पात्रात प्रभू रामाची उत्सव मूर्तीस व संत मुक्ताईच्या पादुकांना जलाभिषेक पूजन, सद्गुरू कंुवर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्ताने भजन, आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम पहिल्या दिवशी होतील. सायंकाळी ५ वाजता पहिल्या वहनाचे विधीवत पूजन श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळेतील ब्रावृंद मंडळींच्या वेदमंत्र घोषात कार्यक्रमास सुरुवात होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगोळे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस निरीक्षक कुबेर चौरे,पोलीस निरीक्षक वाडिले, पोलीस निरीक्षक सुनील कुर्हाडे, ह.भ.प. नाना महाराज कुळकर्णी, चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर, संस्कार भारतीचे अनिल अभ्यंकर, वासुदेव महाजन आदींची उपस्थिती असेल.