चेन्नई : आयकर विभागाने सोमवारी तामिळनाडूतील एसपीके समूहाच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. हा समूूह रस्त्यांच्या कामाचे ठेके घेतो. या समूहाची चेन्नई, मदुराई आणि अरुपुक्कोत्ताई येथे कार्यालये आहेत. कर चोरी प्रकरणात जवळपास ३० ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. हा समूह हॉटेल व्यवसायातही सक्रीय असून तपास एजन्सी त्यांना जप्त करण्यात आलेल्या नगदी आणि कागदपत्रांबाबत स्पष्टीकरण मागत आहे. हा समूह डीएमके पक्षाचा निकटवर्तीय समजला जातो. आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही.राज्यातील महामार्ग विभाग मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याकडे आहे. दरम्यान,आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी क्रिस्टी फे्रेडग्राम प्रा. लि. कंपनीच्या परिसरात धाडी टाकल्या होत्या.ही कंपनी पोषक आहारांतर्गत अंडी आणि इतर अन्नपदार्थांचा पुरवठा गरीब विद्यार्थ्यांना करते.असे सांगितले जात आहे की,राज्यात अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडीतून मोठ्या प्रमाणात दस्तऐवज आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
तामिळनाडूत एसपीके समूहाच्या ठिकाणांवर धाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:28 AM