शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

उपद्रवी गोत्रावरून रण

By admin | Published: February 03, 2015 2:15 AM

जाहिरातीत आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांच्या गोत्राला ‘उपद्रवी’ संबोधले आहे़

भाजपची जाहिरात : हा तर माझ्या समुदायाचा अपमान -केजरीवालनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपची आणखी एक जाहिरात वादग्रस्त ठरली आहे़ या जाहिरातीत आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांच्या गोत्राला ‘उपद्रवी’ संबोधले आहे़ दरम्यान या जाहिरातीवर केजरीवाल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून हा माझ्या संपूर्ण समुदायाचा अपमान असल्याचे म्हटले आहे़ आपने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे़भाजपकडून सोमवारी वृत्तपत्रांत जाहिरात प्रकाशित झाली आहे़ यात अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांना ‘उपद्रवी’ गोत्राचे संबोधण्यात आले आहे़ जाहिरात प्रकाशित होताच, केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला़ गेल्या काही दिवसांपासून भाजप आपल्या जाहिरातींमधून माझ्यावर वैयक्तिक हल्ले करीत आहे़ भाजपने मला आणि माझ्या मुलांना लक्ष्य केले़ पण मी शांत राहिलो़ कारण अण्णा म्हणतात की, कुणी तुमच्यावर वैयक्तिक हल्ले करीत असेल तर ते सहन करण्याची शक्ती तुमच्यात असू द्या़ पण आज भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या़ भाजपने माझ्या अग्रवाल समुदायाला ‘उपद्रवी’ संबोधले़ यासाठी भाजपने माझ्या संपूर्ण समुदायाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली़ आपने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे़ आपचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी ही माहिती दिली़ काँग्रेसनेही यानिमित्ताने भाजपवर हल्ला चढवला आहे़ जाती व समुदायाच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे़भाजपकडून बचावआम आदमी पार्टीच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपने आपला बचाव केला आहे़ ‘आप’ला आपल्या कामाशिवाय अन्य सगळ्या गोष्टी अपमानास्पद वाटतात, असे भाजपा नेते नलिन कोहली म्हणाले़ आपच्या निवडणूक राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे़, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)आदर्शवादाच्या गप्पा मागणाऱ्या केजरीवालांनी जाणीवपूर्वक जातीचे राजकारण पुढे केले आहे, असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले़ कोटभाजपा आणखी खालच्या पातळीवर गेला़ आता आपल्या जाहिरातीत भाजपाने केजरीवाल यांच्या गोत्राला लक्ष्य केले आहे़ या गोत्राचे लोक भाजपाला धडा शिकवणाऱ- आशुतोष, आप नेते(टिष्ट्वटरवरील प्रतिक्रिया)बॉक्सभाजपाकडून बचावआम आदमी पार्टीच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपाने आपला बचाव केला आहे़‘आप’ला आपल्या कामाशिवाय अन्य सगळ्या गोष्टी अपमानास्पद वाटतात, असे भाजपा नेते नलिन कोहली म्हणाले़ आपच्या निवडणूक राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे़ आदर्शवादाच्या गप्पा मागणाऱ्या केजरीवालांनी जाणीवपूर्वक जातीचे राजकारण पुढे केले आहे, असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले़याचिकेवर आज सुनावणीभाजप आणि काँग्रेसकडून लाच घ्या; पण मत मात्र आम्हाला द्या, या आक्षेपार्ह विधानासाठी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या फौजदारी तक्रारीवर दिल्लीचे एक न्यायालय मंगळवारी सुनावणी करणार आहे़४या जाहिरातीत टोपी आणि मफलर घातलेली एक व्यक्ती राजपथाच्या परेडमध्ये उभी असलेली दाखवण्यात आली आहे़ या व्यक्तीच्या हातात झाडूही दाखवला आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील प्रमुख पाहुणे बराक ओबामा यांनाही जाहिरातीत दाखवण्यात आले आहे़ ‘मेरी ना सुनी तो, २६ जनवरी का प्रोग्राम बिघाड दुंगा और एक साल बाद व्हीआयपी पास की गुहार लगाऊंगा’, असे या जाहिरातीत लिहिलेले आहे़ याशिवाय,‘हे आंदोलनकारी़.़देश के करोडों लोग गणतंत्र दिवस को राष्ट्रीय पर्व मानते आहे़ इस पर गर्व करते है और आपका उपद्रवी गोत्र इसमें भी व्यवधान डालने को तैयार था’ असेही यात म्हटले आहे़ यापूर्वी भाजपने अशीच एक वादग्रस्त जाहिरात प्रकाशित केली होती़ या जाहिरातीतील व्यंगचित्रात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला दाखवलेला होता़ बेदींवर हुकूमशाहीचा आरोप करणाऱ्याची लगेच ‘घरवापसी’दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचार सहायक नरेंद्र टंडन यांनी बेदींवर हुकूमशाही वागणुकीचा आरोप करीत सोमवारी पक्षाला रामराम ठोकला. यानिमित्ताने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याने भाजपवर खजील होण्याची पाळी आली. परंतु नंतर मात्र त्यांनी आपला राजीनामा परत घेतला.भाजपच्या शहर शाखेचे माजी सचिव असलेले टंडन हे दिल्ली कार्यकारिणीचे स्थायी आमंत्रित आहेत. बेदींसोबत काम करणे अत्यंत कठीण असल्याचे सांगून त्यांनी सकाळी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला होता. त्यांनी तो मंजूरही केला. परंतु नंतर मात्र भाजप सोडण्याचा आपला निर्णय भावनात्मक होता असे सांगून त्यांनी राजीनामा मागेही घेतला. तत्पूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने टंडन यांचा राजीनामा मंजूर केला असल्याचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले.