नवी दिल्ली- एम्स रुग्णालयात दाखल असलेल्या लालू प्रसाद यादवांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर नवाच वाद उफाळून आला आहे. लालू प्रसाद यादव यांनी एम्सच्या व्यवस्थापकांना पत्र लिहून सांगितलं की, मला डिस्चार्ज देऊ नका. तर दुसरीकडे एम्स रुग्णालयानं लालू प्रसाद यादवांना डिस्चार्ज दिला आहे. आता त्यांना रांचीला नेण्यात आलं आहे.चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगत असलेले आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादवांची अचानक तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर लालू प्रसाद यादवांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लालू प्रसाद यादवांनी एम्स व्यवस्थापकांना पत्र लिहून डिस्चार्ज न देण्याची विनंती केली होती. परंतु लालूंची तब्येत ठीक असल्याचं कारण देत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर लालू प्रसाद यादवांनी धिंगाणा घातला आहे.एम्सनं म्हटलं आहे की, लालू प्रसाद यादव यांना रिम्समधून इथे हलवण्यात आलं होतं. त्यांच्या तब्येतीत फार सुधारणा आहे. त्यानंतर त्यांना परत रिम्स मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. लालूनं म्हटलं आहे की, मला सांगण्यात आलं आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी कारवाई सुरू आहे. माझ्यावर चांगले उपचार व्हावेत, यासाठी मला आणलं गेलं आहे. मी हृदयरोग, किडनी इन्फेक्शन, डायबेटिससह इतर आजारांनी ग्रस्त आहे. कमरेच दुखत असल्यानं मला वारंवार चक्कर येते. मी ब-याचदा शौचालयात पडलो आहे. मला रक्तदाब आणि शुगर मध्येच वाढते.
'मला राहू दे'... एम्समधील मुक्काम वाढवण्यासाठी लालूंनी वाचला आजारांचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 4:40 PM