बोगद्याबाहेर बाबा बौख नाग देवतेचे मंदिर, 41 मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये; उत्तराखंड मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 10:37 PM2023-11-28T22:37:39+5:302023-11-28T22:39:35+5:30
सर्व मजुरांची प्रकृती ठीक असून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद ओसंडत होता.
उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना आज सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या बचाव मोहिमेवेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंह हे उपस्थित होते. मजुरांचे फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आले. सर्व मजुरांची प्रकृती ठीक असून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद ओसंडत होता.
धामी यांनी या मोहिमेनंतर पत्रकार परिषद घेतली, यामध्ये त्यांनी बाबा बौख नाग देवतेचे मंदिर बोगद्याबाहेर बांधण्याची घोषणा केली. तसेच 41 मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत देण्याचेही जाहीर केले. या मजुरांना बाहेर काढताना एक क्रम ठरविण्यात आला होता, पाईप अरुंद असल्याने कमी उंचीच्या मजुरांना आधी बाहेर काढण्यात आले. यानंतर जास्त उंचीच्या मजुरांना बाहेर काढण्यात आल्याचे धामी यांनी सांगितले.
#WATCH उत्तरकाशी (उत्तराखंड): सीएम पुष्कर सिंह धामी ने कहा, "इस पूरे अभियान में लगे हुए सभी कर्मचारियों, विशेषज्ञों, विज्ञानिकों, भारत संस्थाओं को मैं धन्यवाद करता हूं।...पीएम मोदी लगातार मेरे संपर्क में थे और बचाव अभियान का अपडेट ले रहे थे। उन्होंने मुझे किसी भी तरह सभी को… pic.twitter.com/3UFgBCciSJ
— ANI_HindiNews (@AHindinews) November 28, 2023
याचबरोबर धामी यांनी रॅट मायनिंग करणाऱ्या टीमचे कौतुक केले. हे मायनर्स गोरखपूर आणि दिल्ली जल बोर्डाकडून आले होते, असे धामी यांनी सांगितले. या मायनर्सनी १५ मीटर खोदाई केली आणि जेव्हा ते मजुरांपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना मजुरांनी अक्षरश: मिठ्या मारल्या होत्या.