महाराष्ट्र बँकेसमोर चोरट्याने लुटले १.१५ लाख रुपये चोरट्यांची होती पाळत : सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM
सोलापूर : महाराष्ट्र बँकेतून काढलेली १ लाख १५ हजारांची रोकड बॅगेत ठेवून आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवल्याचा प्रकार आज (शुक्रवारी) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आसरा चौकातील बँकेसमोर घडला. चोरट्यापैकी एक जण बँकेत आलेल्या विनायक पुल्लावर पाळत ठेवत होता. सीसीटीव्ही कॅमेर्यात ते चित्र कैद झाले.
सोलापूर : महाराष्ट्र बँकेतून काढलेली १ लाख १५ हजारांची रोकड बॅगेत ठेवून आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवल्याचा प्रकार आज (शुक्रवारी) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आसरा चौकातील बँकेसमोर घडला. चोरट्यापैकी एक जण बँकेत आलेल्या विनायक पुल्लावर पाळत ठेवत होता. सीसीटीव्ही कॅमेर्यात ते चित्र कैद झाले. होटगी रोडवरील एका वृत्तपत्रात रोखपाल म्हणून काम पाहणारे विनायक पुल्ला हे आसरा चौकातील महाराष्ट्र बँकेत आले होते. कर्मचार्यांच्या वेतनाची रक्कम म्हणून त्यांनी १ लाख १५ हजार रुपये काढले. ती रक्कम बॅगेत ठेवून पुल्ला हे बँकेच्या बाहेर पडले आणि आपल्या एमएच-१३/एडब्ल्यू-३४२० या मोटरसायकलवरून स्वार होत असतानाच पाठीमागून एका चोरट्याने त्यांच्या पाठीवर हात ठेवला. कोण आहे म्हणून मागे पाहत असताना समोरुन आलेल्या दुसर्या चोरट्याने त्यांची बॅग पळवली आणि तो होटगी रोडच्या दिशेने पळून गेला. घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त बालासिंग रजपूत, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुशकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. विनायक दत्तात्रय पुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार हराळे करीत आहेत. (प्रतिनिधी)इन्फो बॉक्सदुचाकीचा क्रमांक टिपता आला असताकिमान चार ते पाच चोरटे पाळत ठेवूनच ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. पुल्ला हे बँकेत आल्यानंतर बँकेत दोघे त्यांच्यावरच लक्ष ठेवून होते. त्यांच्यापैकी एकाची मोटरसायकल बँकेच्या समोरच होती; मात्र त्या मोटरसायकलच्या बाजूला एक रिक्षा थांबली होती. ती रिक्षा नसती तर त्या मोटरसायकलचा क्रमांक पुल्ला यांना टिपता आला असता.कोटबँकेत आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असले तरी त्यांचा पाठमोरा भाग दिसतो. सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज मागवण्यात आले असून, घटनेतील बारकावे शोधून नक्कीच चोरट्यांचा शोध घेण्यात येईल.-शर्मिष्ठा घारगे-वालावलकरसहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)