शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

किमती वाढवणाऱ्या टायर कंपन्यांना 1500 कोटी रुपयांचा दंड, MRF लाही दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 9:01 AM

स्पर्धा आयोगाचा दणका

खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : संघटना करून टायरच्या किमती वाढविल्याबद्दल भारतीय स्पर्धा आयोगाने पाच टायर उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एटीएमए) यांना १५०० कोटींचा दंड ठोठावला आहे. २०१८ मध्ये ऑल इंडिया टायर डीलर्स फेडरेशनने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीत टायर उत्पादक कंपन्यांनी नैसर्गिक रबर आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे निमित्त करून टायर आणि ट्यूबच्या किमती वाढविल्या. तथापि, या कच्च्या मालाच्या किमतीत नंतर मोठ्या प्रमाणात कपात झाली, शिवाय उत्पादन शुल्क कमी झाले तरी टायरच्या किमती त्या प्रमाणात कमी केल्या नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. टायर उद्योजक टायरच्या किमतीवर नियंत्रण ठेवत असल्याने नैसर्गिक रबरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा फायदा ग्राहकांना दिला जात नव्हता. एमसीएने ही तक्रार स्पर्धा आयोगाकडे पाठवली. आयोगाच्या महासंचालकांनी या आरोपांची चौकशी केली.

चौकशीत टायर कंपन्या आणि असोसिएशनने बाजारातील टायरच्या किमती वाढवण्यासाठी, उत्पादन आणि पुरवठावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटना केली असल्याचे स्पष्ट झाले. आयोगाने २०१८ मध्ये पाच टायर उत्पादक कंपन्या आणि एटीएमए यांना स्पर्धा कायद्यांतर्गत दोषी धरले.या चौकशीला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. हायकोर्टाच्या निर्देशानुसार आयोगाने आपले आदेश सीलबंद पाकिटात ठेवले. ६ जानेवारी २०२२ रोजी हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. टायर कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. २८ जानेवारी २०२२ रोजी ते फेटाळण्यात आले. यानंतर आयोगाने २०१८ चा आदेश सार्वजनिक केला. दंडाव्यतिरिक्त आयोगाने या कंपन्यांना हे सर्व बंद करण्याचा आदेशदेखील दिला आहे.टायर कंपन्यांकडून घाऊक आणि किरकोळ किमतीची माहिती गोळा करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याच्या आदेशासह एटीएमएवरही ८.४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आकारलेला दंडअपोलो टायर्स :     ४२५.५३ कोटीएमआरएफ लिमिटेड :     ६२२.०९ कोटीसिएट लि. :     २५२.१६ कोटीजेके टायर :     ३०९.९५ कोटीबिर्ला टायर्स :     १७८.३३ कोटी

टॅग्स :Courtन्यायालयdelhiदिल्ली