हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सर्वच पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. यातच आता हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी चंदीगडमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या 40 पानी जाहीरनाम्यात काँग्रेसने लोकांना 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि महिलांना दरमहा 2000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्यातून पाणी आणण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपूर्वी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाने हरियाणातील जनतेसाठी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली 'सात वादे-पक्के इरादे' नावाने सात आश्वासनांची घोषणा केली होती
काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे.
जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा -- सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण- तरुणांना रोजगार- चांगली आरोग्य सेवा, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार- महिलांना दर महिन्याला 2000 रुपयांपर्यंत सहाय्य- किसान आयोगाची स्थापना आणि किमान आधारभूत किंमतीची (MSP) हमी- तरुणांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणार नाही, याची खात्री करण्यासाठी एका विभागाची स्थापना करण्यात येईल.- एक विभाग का गठन जो सुनिश्चित करेगा कि बड़े पैमाने पर युवाओं का पलायन न हो- अल्पसंख्यक आयोगाची स्थापना
काँग्रेसचेच सरकार येणार -खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणामध्ये एक मजबूत मजबूत क्रीडा धोरण आणले जाईल. काँग्रेस नेते अशोक गेहलोत जाहीरनामा जाहीर करताना म्हणाले, "आम्ही घोषणापत्र जाहीर केले आहे आणि काँग्रेसच सरकार स्तापन करेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. या जाहीरनाम्याचा नियमितपणे आढावा घेतला जाईल आणि सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील."