डिप्पी वांकाणी, मुंबईक्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्याचा क्रिकेट रसिकांनी भलेही आनंद लुटला असेल; पण या सामन्यामुळे अक्षरश: ‘लूट गए’ म्हणण्याची वेळ सट्टेबाजारात पैसा लावणाऱ्या पंटरवर (सट्टा लावणारा) आली आहे. थोडेथोडके नाही, तर तब्बल २ हजार कोटी रुपयांचे नुकसान या पंटरचे झाले आहे. विंडीजच्या ब्रेथवेटने अखेरच्या षटकात लागोपाठ ४ षटकार मारून सामन्याचे चित्र तर बदललेच; पण या सट्टेबाजारालाही मोठा धक्का दिला. विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी आणि लंचनंतर तसेच वेस्ट इंडिजचे फलंदाज बाद होत असताना सातत्याने सट्टेबाजांचे दर बदलत होते. शेवटच्या षटकातही प्रत्येक षटकारानंतर हे गणित बदलत होते. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, या वर्ल्ड कप सामन्यात सट्टेबाजांची ही उलाढाल २५ हजार कोटींच्या घरात होती. हे हिशेब सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण झालेले असतील, तर आगामी आयपीएल सामन्यासाठी सट्टेबाज दरांची घोषणा गुरुवारी करतील. एका बुकीने सांगितले की, सामना सुरू होण्यापूर्वी आमचा असा अंदाज होता की, यात वेस्ट इंडिजच जिंकणार आणि आमची पसंतीही विंडीजलाच होती. लंचपर्यंत विंडीजचा खेळही तसा चांगलाच होता; पण विंडीजचे दोन फलंदाज बाद झाल्यावर आणि अखेरच्या षटकात, तर इंग्लंड विजयाच्या जवळ असताना आम्ही आमचे दर बदलून टाकले. पंटरनेही अखेरच्या षटकात इंग्लंडच्या बाजूने बोली लावली. कारण, एका षटकात एवढ्या धावा करणे विंडीजला शक्य नाही, असाच अंदाज लावला जात होता. कोलकाता आणि जयपूर शहरांतून हे सट्टेबाज पूर्ण नियंत्रण करतात, तर ६६६.ुी३ां्र१.ूङ्मे तसेच ६६६.ुी३365.ूङ्मे या वेबसाईटवरून सट्ट्यांचा हा व्यवहार चालतो. सामन्यात कोण अधिक बळी घेईल? अथवा कोण अधिक धावा काढेल? अशा स्वरूपाच्या बोली आम्ही स्वीकारत नाहीत. तथापि, या सामन्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला, असेही या बुकीने सांगितले. दरम्यान, हा तोटा आता आगामी आयपीएल सामन्यातून कसा भरून काढता येईल? याकडे पंटरचे लक्ष आहे. गुरुवारी या दरांची घोषणा होणार आहे.>>>>> वेस्ट इंडिज ८५ पैसे इंग्लंड १.१५ पैसे लंच टाइम वेस्ट इंडिज ३६ पैसे इंग्लंड २.५० रु. विंडीजचा पहिला बळी गेल्यानंतर वेस्ट इंडिज ५५ पैसे इंग्लंड १.६५ पैसेख्रिस गेल बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिज १ रु. इंग्लंड ९० पैसे शेवटच्या षटकापूर्वी वेस्ट इंडिज ५ रु. इंग्लंड १६ पैसे ब्रेथवेटने पहिला षटकार मारल्यानंतर वेस्ट इंडिज २ रु. इंंग्लंड ४० पैसे ब्रेथवेटने दुसरा षटकार मारल्यानंतर वेस्ट इंडिज १० पैसे इंंग्लंड १० रुपये
सट्टेबाजारात २,००० कोटींचे नुकसान
By admin | Published: April 05, 2016 2:19 AM