४३५ कोटींच्या प्रस्ताव महासभेपुढे अमृत योजना : मनपाचा दरवर्षी २२ कोटींचा खर्च वाढणार
By admin | Published: May 12, 2016 10:53 PM
जळगाव : शहरासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार्या अमृत योजनेच्या ४३५ कोटी २७ लक्ष ९ हजार ५२ रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यतेचा विषय येत्या १९ रोजी होणार्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. यात पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे.
जळगाव : शहरासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार्या अमृत योजनेच्या ४३५ कोटी २७ लक्ष ९ हजार ५२ रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यतेचा विषय येत्या १९ रोजी होणार्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. यात पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे. महापालिकेची महासभा येत्या १९ मे रोजी आयोजिण्यात आली आहे. विषय पत्रिकेवरील १३ विषयांसह आयत्या वेळच्या काही विषयांवर महासभेत चर्चा होईल. अमृत, हुडको कर्जाचा विषयकेंद्र शासनाच्या अमृत योजनेत जळगाव महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. नगररचना विभागाच्या अमृत योजना विषयक उच्च स्थरीय अधिकारी वर्गाच्या बैठकीत जळगाव महापालिकेच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. मात्र काही बाबी नव्याने समाविष्ट करण्यात आल्याने त्यांना मंजुरीचे पाच विषय महासभेत मान्यतेसाठी आहे. पाणी पुरवठा, मलनि:सारण, पावसाच्या पाण्याची निचरा व्यवस्था, हरित क्षेत्र विकसित करण्याचे प्रस्ताव महापालिकेने शासनाच्या समितीकडे सादर केले आहेत. यासाठी २५ टक्के स्वहिस्सा १४ व्या वीत्त आयोगाच्या निधीतून भरण्यास महासभेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. तसे पत्रही शासनाकडे पाठविण्यात आले आहे. अमृत मधील पहिल्या टप्प्यात १२४ कोटी ३४ लक्ष ७० हजार २७५, टप्पा क्रमांक २ १२४ कोटी ८१ लक्ष ६५ हजार २७० अशा एकूण २४९ कोटी १६ लक्ष ३५ हजार ५४५ ला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. या दोन टप्प्यांव्यतिरिक्त भाववाढ खर्च १७ कोटी ४४ लक्ष १४ हजार ५१९, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा शुल्क ३ टक्के प्रमाणे ७ कोटी ९९ लाख ८१ हजार ५१५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागास द्यावे लागणार आहेत. तसेच ५ वर्षांसाठी योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी येणारा १६० कोटी ६६ लक्ष ७६ हजार ९६२ रुपयांचा निधी मिळून ४३५ कोटी २७ लक्ष ९ हजार ६२ रुपये अशा सर्व मिळून ४३५ कोटी २७ लक्ष ९ हजार ६२ रुपयांच्या खर्चाच्या विषयास महासभेत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.