शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

साखर निर्यातीला प्रतिटन 6 हजार रुपये अनुदान; पाच कोटी ऊस उत्पादकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 2:39 AM

अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

नवी दिल्ली : ऊस उत्पादकांची थकबाकी देण्यासाठी कारखान्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने बुधवारी साखर निर्यात अनुदान योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार साठ लाख टन साखरेच्या निर्यातीवर प्रतिटन सहा हजार रुपये याप्रमाणे साडेतीन हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत ६० लाख टन  साखर निर्यात अनुदान योजनेला मंजुरी दिल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.  २०१९-२० या हंगामात हेच अनुदान प्रति टन १०,४४८ रुपये होते. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर थोडेफार वधारले असल्याने निर्यात अनुदानाची रक्कम प्रति टन सहा हजार रुपये करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. यंदाही ते ३१० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. १८ हजार कोटींचे उत्पन्न मिळू शकेल  केंद्राच्या या निर्णयाचा फायदा देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि पाच लाख साखर कारखान्यांचे कर्मचारी यांना होणार आहे; तर या साखर निर्यातीतून कारखान्यांना १८ हजार कोटींचे उत्पन्न मिळू शकेल, असेही जावडेकर यांनी सांगितले.ऊस उत्पादकांना मिळणार ११०० कोटी केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या निर्यात अनुदान योजनेतील ६० लाख टनांपैकी सुमारे १८ लाख टन साखरेचा निर्यात कोटा महाराष्ट्राच्या वाट्याला येईल.  या  निर्यातीची लक्ष्यपूर्ती झाल्यास राज्यातील ऊस ऊस उत्पादकांना सुमारे ११०० कोटी रुपये मिळू शकतील. कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला सुमारे अडीच टन निर्यात कोटा येवून सुमारे १५० कोटी रुपये मिळू शकतील.