नवी दिल्ली: सिंध प्रांताविना भारत अपूर्ण वाटतो, अशी खंत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी रविवारी येथे व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना स्थान द्यावे, असेही एक मोघम विधान त्यांनी केले. संघात मुलेच असतात. पण प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेप्रमाणे संघानेही महिलांना महत्त्वाचे स्थान द्यायला हवे, त्यांच्याकडेही नेतृत्व हवे, असे ते म्हणाले.सिंध प्रांताची राजधानी असलेल्या ज्या कराची शहरात एका सिंधी कुटुंबात आपला जन्म झाला ते आज भारतात नाही, यानेही आपले मन विषण्ण होते, असेही आडवाणी म्हणाले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालायाचे संस्थापक व आध्यात्मिक गुरु पिताश्री ब्रह्मा यांच्या पदग्रहणाच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोदित कार्यक्रमात आडवाणी बोलात होते. ते म्हणाले की, कराची आणि सिंध आता भारतात नाहीत याने माझे मन कधी कधी विषण्ण होते. सिंधमध्ये राहात असताना बालपणी मी रा.स्व. संघात खूप सक्रिय होतो. सिंध प्रांत भारतात नसावा याचे वैशम्य वाटते. सिंधविना भारत अपूर्ण आहे, असे मला वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रा.स्व. संघात महिलांना स्थान हवे - आडवाणी
By admin | Published: January 16, 2017 6:44 AM