"...म्हणून RSS आणि BJP ला जात जनगणना नकोय", काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:04 PM2024-09-02T18:04:18+5:302024-09-02T18:04:47+5:30
गेल्या काही काळापासून देशात जात जनगणनेचा मुद्दा पेटला आहे.
Caste Census : देशात सध्या जातीय जनगणनेचा (caste census) मुद्दा चांगलाच पेटला आहे. विरोधक सातत्याने जात जनगणनेची मागणी करत आहेत, तर सत्ताधारी भाजपा यावर काहीच बोलायला तयार नाही. अशातच, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) जातीय जनगणनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. आरएसएस आणि भाजपा जात जनगणनेच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
RSS ने जातिगत जनगणना का खुलकर विरोध कर दिया है।
— Congress (@INCIndia) September 2, 2024
RSS का कहना है- जातिगत जनगणना समाज के लिए सही नहीं है।
इस बयान से साफ है कि BJP और RSS जातिगत जनगणना नहीं कराना चाहते।
वे दलितों, पिछड़ों और आदिवासियों को उनका हक नहीं देना चाहते।
लेकिन लिखकर रख लीजिए- जातिगत जनगणना होगी और…
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले की, "आरएसएसने जात जनगणनेला उघडपणे विरोध केला आहे. आरएसएसचे म्हणणे आहे की, जातीय जनगणना समाजासाठी चांगली नाही. भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही, हे या विधानावरुन स्पष्ट होते. त्यांना दलित, मागासवर्गीय, आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत. पण, लिहून घ्या...जात जनगणना होईल आणि ती काँग्रेस करेल," असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
RSS ने काय म्हटले ?
आरएसएसचे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, केवळ राजकीय फायद्यासाठी जात जनगणना करू नये. हिंदू धर्मात जात ही संवेदनशील बाब आहे. याचा निवडणुकीच्या पलीकडे विचार व्हायला हवा. कोणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जात जनगणना झाली पाहिजे, पण फक्त निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी जात जनगणना करू नये. जात जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. आपल्या समाजात जातीय प्रतिक्रियांचा मुद्दा संवेदनशील आहे आणि तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा आहे, परंतु जातीच्या जनगणनेचा उपयोग निवडणुकीसाठी न करता विशेषत: दलितांच्या कल्याणासाठी केला पाहिजे.