ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही देशातील क्रमांक एकची दहशतवादी संघटना असून, त्यात कोणताच संशय नाही, असे वकतव्य असे वक्तव्य महाराष्ट्राचे माजी पोलिस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांनी केले आहे. मुंबईत २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दिवंगत पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देशभरात झालेल्या १३ दहशतवादी हल्ल्यांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये आरडीएक्ससारख्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता, असे मुश्रीफ म्हणाले. आरएसएस ही देशातील एक नंबरची दहशतवादी संघटना आहे यात शंका नाही, पण दहशतवादी संघटनेच्या स्वरूपात संघाचे सत्ताधारी पक्षांसोबत नाते काही नाते राहिले नाही. देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी संघाचे काम सुरूच असते, असेही मुश्रीफ म्हणाले.