प्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 08:23 PM2018-06-07T20:23:30+5:302018-06-07T20:23:30+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून प्रणवदांचं कौतुक

rss chief mohan bhagwat breaks protocol for pranab mukherjee in nagpur | प्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा

प्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा

Next

नागपूर: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असताना या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जींचं कौतुक केलं. मुखर्जींनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यानं सरसंघचालकांनी त्यांचे आभारदेखील मानले. प्रणव मुखर्जी आदरणीय व्यक्ती असून ते यापुढेही प्रणव मुखर्जीच राहतील, असं सरसंघचालक म्हणाले. 

प्रणव मुखर्जी यांच्यासाठी सरसंघचालकांनी संघाची परंपरा मोडली. सरसंघचालक नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी भाषण करतात. मात्र मुखर्जी यांच्यासाठी त्यांनी ही परंपरा बाजूला ठेवली. संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात समारोपाचं भाषण करण्याची संधी भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांनी दिली. मुखर्जी अतिशय मोठं व्यक्तिमत्त्व असल्यानं, त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं असल्यानं सरसंघचालकांनी त्यांना समारोपाचं भाषण करण्याची संधी दिल्याचं सांगितलं जातं आहे. 
 

Web Title: rss chief mohan bhagwat breaks protocol for pranab mukherjee in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.