ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.12 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (आरएसएस) यंदाचा दसरा सण विशेष ठरला आहे. याचे कारण, आरएसएसने 90 वर्षांपासून त्यांचे स्वयंसेवक वापरत असलेल्या खाकी हाफ पॅन्टच्या गणवेशात बदल करत त्यांचे परिवर्तन फुल पॅन्टमध्ये केले. या नव्या गणवेशाचा शुभारंभ विजयादशमी मुहूर्तावर करण्यात आला. आरएसएसने केलेल्या या परिवर्तनावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी कोपरखळी घेत, संघातील या परिवर्तनाचे श्रेय आपली पत्नी राबडीदेवी यांनी दिले आहे.
'आम्ही आरएसएसला फुल पॅन्ट घालायला लावलीच, राबडी देवी यांनी बरोबर म्हटले होते, यांना संस्कृ़तीचे ज्ञान नाही, लाज वाटत नाही, हाफ पॅन्टमध्ये फिरत असतात', असे आपल्या पत्नीच्या वक्तव्याचा दाखल देत लालूंनी आरएसएसची त्यांच्या गणवेशावरुन खिल्ली उडवली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत आरएसएसवरची खिल्ली उडवली आहे.
अभी तो हमने हाफ को फुल पेंट करवाया हैमाइंड को भी फुल करवायेंगेपैंट ही नहीं सोच भी बदलवायेंगेहथियार भी डलवायेंगेजहर नही फ़ैलाने देंगे।। pic.twitter.com/LAIUV6dRYA— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) October 11, 2016
हमने RSSको फुल पैंट पहनवा ही दिया।राबड़ी देवी ने सही कहा था इन्हें संस्कृति का ज्ञान नही,शर्म नहीं आती,बूढ़े-बूढ़े लोग हाफ पैंट में घूमते है— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) October 11, 2016
तसेच 'आता तर आम्ही हाफ पॅन्टची फुल पॅन्ट केली आहे, त्यांचे माईंडही फूल करू, पॅन्टच नाही तर त्यांचे विचारही बदलायला लावू, शस्त्रही सोडायला लावू, विष पसरू देणार नाही',असे देखील त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. जानेवारी महिन्यामध्ये पाटणामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यक्रमात राबडीदेवी यांनी आरएसएसला टार्गेट करत त्यांच्या स्वयंसेवकांच्या गणवेशावर टीका केली होती. याचाच दाखला लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये दिला आहे.