शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
4
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
5
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
6
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
7
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
8
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
9
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
10
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
11
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
12
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
13
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
14
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
15
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
17
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
18
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
19
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
20
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 18:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यातील सविस्तर पॉडकास्ट रिलीज करण्यात आला आहे. यात पीएम मोदींनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

PM Narendra Modi Podcast : पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन ( Lex Fridman) यांच्यातील पॉडकास्ट आज(16 मार्च) रिलीज करण्यात आला आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका, त्यांचे समाजातील योगदान आणि वैयक्तिक अनुभव...याबद्दल चर्चा झाली. 

लेक्सने फ्रीडमन यांनी प्रश्न विचारला की, तुम्ही आठ वर्षांचे असताना हिंदू राष्ट्रवादाच्या कल्पनेला पाठिंबा देणाऱ्या आरएसएसमध्ये सामील झाला होता. RSS बद्दल काय सांगाल? संघटनेचा तुमच्यावर आणि तुमच्या राजकीय विचारांच्या विकासावर काय परिणाम झाला?

'संघाला समजणे इतके सोपे नाही'

पीएम मोदी म्हणाले की, आमच्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा होती, तिथे देशभक्तीपर गाणी वाजवली जायची. त्या गाण्यांमधील काही गोष्टी मला खूप स्पर्शून गेल्या आणि अशा प्रकारे मी RSS चा भाग झालो. RSS मध्ये आम्हाला दिलेल्या मूलभूत मूल्यांपैकी एक म्हणजे तुम्ही जे काही कराल, ते एका उद्देशाने करा. राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी करा. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला तर मी इतका अभ्यास केला पाहिजे की तो देशासाठी उपयुक्त ठरावा. मी व्यायाम केला, तर इतका व्यायाम केला पाहिजे की, माझे शरीरही देशासाठी उपयुक्त ठरावे. हेच संघवाले शिकवतात. संघ ही खूप मोठी संघटना आहे. आता संघाचा 100 वा वर्धापन दिन जवळ आला आहे. एवढी मोठी स्वयंसेवी संस्था कदाचित जगात कुठेही अस्तित्वात नाही. संघाशी करोडो लोक जोडले गेले आहेत. पण संघाला समजून घेणे इतके सोपे नाही. त्याच्या कार्याचे स्वरूप खरोखर समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीपेक्षा, संघ तुम्हाला एक स्पष्ट दिशा प्रदान करतो ज्याला खरोखर जीवनाचा एक उद्देश म्हणता येईल.

दुसरे म्हणजे, देश सर्वस्व आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हे वैदिक काळापासून सांगितले जाते. हेच आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे, हेच विवेकानंदांनी सांगितले आहे आणि हेच संघाचे लोक म्हणतात. संघाकडून मिळालेली प्रेरणा घेऊन तुम्ही समाजासाठी काहीतरी करा, असे स्वयंसेवक सांगतात आणि त्याच भावनेने प्रेरित होऊन आज अनेक उपक्रम सुरू आहेत. उदाहरणार्थ, काही स्वयंसेवकांनी सेवा भारती नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना सेवा देते. यालाच ते सेवा समाज म्हणतात. माझ्या माहितीनुसार, ते जवळपास 1 लाख 25 हजार सेवा प्रकल्प कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आणि केवळ समुदायाच्या पाठिंब्याने चालवतात. ते तिथे वेळ घालवतात, मुलांना शिकवतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, चांगले संस्कार देतात आणि या समुदायांमध्ये स्वच्छता सुधारण्यासाठी कामे करतात. ही काही छोटी उपलब्धी नाही.

संघाने आदिवासी भागात 70 हजार शाळा उभारल्या

पीएम मोदी पुढे म्हणतात, संघाने पालनपोषण केलेले काही स्वयंसेवक वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत. ते आदिवासींमध्ये राहतात आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करतात. त्यांनी दुर्गम आदिवासी भागात 70,000 हून अधिक शाळा उघडल्या आहेत. अमेरिकेतही असे काही लोक आहेत, जे त्यांच्यासाठी 10 किंवा 15 डॉलर्स दान करतात. काही स्वयंसेवकांनी शिक्षणात क्रांती करण्यासाठी विद्या भारतीची स्थापना केली आहे. आज ते सुमारे 25,000 शाळा चालवतात, सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि मला विश्वास आहे की, या उपक्रमामुळे कोट्यावधी विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. शिक्षणासोबतच मूल्यांनाही प्राधान्य दिले जाते आणि विद्यार्थी समाजावर ओझे बनू नयेत, यासाठी त्यांनी डाउन टू अर्थ राहून कौशल्ये शिकावली जातात. म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मग ती महिला असो, तरुण असो किंवा मजूर असो, RSS ने भूमिका बजावली आहे.

संघाकडून मला संस्कार मिळालेआमच्याकडे भारतीय मजदूर संघ आहे. त्याच्या सुमारे 50,000 युनियन आहेत, ज्यांचे देशभरात लाखो सदस्य आहेत. कदाचित प्रमाणाच्या बाबतीत जगात यापेक्षा मोठी कामगार संघटना नाही. पण ते कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारतात ही मनोरंजक गोष्ट आहे. ऐतिहासिकदृष्ट्या डाव्या विचारसरणीने जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली. त्यांची घोषणा काय आहे? 'जगातील कामगारांनो, एक व्हा.' RSS प्रशिक्षित स्वयंसेवकांनी चालवलेल्या कामगार संघटना कशावर विश्वास ठेवतात? ते म्हणतात, कामगारांनी जग एकत्र केले आहे. इतर म्हणतात, 'जगातील कामगार एक व्हा' आणि आम्ही म्हणतो, 'कामगारांनी जग एकत्र केले आहे.' हा शब्दातला एक छोटासा बदल वाटत असला तरी हा एक प्रचंड वैचारिक बदल आहे. RSS मधून येणारे स्वयंसेवक अशा उपक्रमांना बळ देतात आणि प्रोत्साहन देतात. जेव्हा तुम्ही या उपक्रमांवर नजर टाकाल तेव्हा तुम्हाला दिसेल की गेल्या 100 वर्षात RSS ने भारताच्या चकाचकतेपासून दूर राहून साधकाप्रमाणे समर्पणाने काम केले आहे. अशा पवित्र संस्थेतून मला जीवनमूल्ये आणि संस्कार मिळाले, हे माझे भाग्य आहे, अशी भावना पीएम मोदींनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाprime ministerपंतप्रधान