ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसनं गर्भधारणा विज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून गर्भातच मुलांना चांगले संस्कार देण्याचा दावा केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहयोगी संघटना आरोग्य भारती प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आरोग्य भारतीच्या कार्यक्रमाला गर्भ संस्कार कार्यशाळा असे नाव दिले आहे. दोन दिवसीय चाललेल्या या कार्यशाळेच्या जाहिरात पुस्तिकेत डॉ. करिश्मा नरवीन यांना गर्भ संस्कार स्पेशालिस्ट सांगण्यात आलं आहे. डॉक्टर नरवीन या गुजरातमधील जामनगरमध्ये एका आयुर्वेदिक विश्वविद्यापीठात एक अतिथी व्याख्याता आहेत. त्या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी कोलकात्यात येणार आहेत. आयुर्वेदिक विश्वविद्यापीठातील नरवीन यांचे सहकारी डॉ. हितेश जानी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गर्भ संस्कारांनी प्रतिभाशाली मुलांना जन्म देता येऊ शकतो. तसेच जेनेटिक इंजिनीअरिंगच्या माध्यमातून गर्भातच मुलांना संस्कारी बनवलं जाऊ शकतं. पश्चिम बंगालच्या बाल अधिकार संरक्षण आयोगानं या विरोधात शुक्रवारी कोर्टाचा दरवाजाही ठोठावला होता. आयोगानं याला अवैज्ञानिक सांगितलं आहे. मात्र उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अनन्या चक्रवर्ती म्हणाल्या, हा विज्ञानावर अंधश्रद्धेचा विजय आहे. तसेच आरोग्य भारतीचे वकील प्रणब घोष यांनी आम्ही न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करणार असल्याचं सांगितलं आहे. व्याख्यानाचा व्हिडीओ सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं आरोग्य भारतीला दिले आहेत.
आईच्या गर्भातच मुलांना संस्कार देणार RSS
By admin | Published: May 07, 2017 4:43 PM