शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 6:46 PM

"राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे."

Jagdeep Dhankhar on RSS: काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) सातत्याने टीका केली जाते. आज (दि.31) देखील समाजवादी पक्षाचे खासदार राजीलाल सुमन यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली. तर, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) RSS चा बचाव करताना दिसले. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणे संविधानाच्या विरोधात आहे," अशी प्रतिक्रिया धनखड यांनी दिली. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात गदारोळ झाला व विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

जगदीप धनखड पुढे म्हणतात, "राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे. जे सदस्य हे करत आहेत, ते संविधान पायदळी तुडवण्यासारखे आहे. आरएसएस देशाची सेवा करणारी संस्था आहे. आरएसएसशी निगडित लोक निस्वार्थपणे हे काम करतात. त्यांनाही देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. आरएसएसची विश्वासार्हता निर्दोष आहे. राष्ट्रीय कल्याण आणि आपल्या संस्कृतीत RSS चे योगदान पाहून आनंद होतो. अशा कोणत्याही संस्थेचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.

सपा खासदाराचा काय आरोप?समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी एनटीए (National Testing Agency) अध्यक्षांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, सरकारसाठी या पदावर असणारी व्यक्ती संघाशी संबंधित आहे की, नाही हे महत्त्वाचे आहे, अशी टीकाही केली होती. यावर जगदीप धनखड संतापले आणि ही टिप्पणी रेकॉर्डवर येऊ दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRajya Sabhaराज्यसभाUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Samajwadi Partyसमाजवादी पार्टी