शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

सहारनपूर हिंसेसाठी BJP-RSS जबाबदार- मायावती

By admin | Published: May 24, 2017 4:19 PM

सहारनपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसेचा प्रकार समोर आला आहे. हिंसेनंतर राजकीय वक्तव्यांनाही उधाण आलं आहे

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 24 - सहारनपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसेचा प्रकार समोर आला आहे. हिंसेनंतर राजकीय वक्तव्यांनाही उधाण आलं आहे. भारतीय जनता पार्टीनं सहारनपूर हिंसेसाठी मायावतींना जबाबदार धरलंय. तर बहुजन समाज पार्टीनं भाजपावर पलटवार केला आहे. मायावती म्हणाल्या, सहारनपूरच्या हिंसेसाठी भाजपा जबाबदार आहे. भाजपा आणि संघ समाजातले जातीयवादी तत्त्व बिघडवण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी बहुजन समाज पार्टीचे चार जण आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहेत. या नेत्यांमध्ये सतीश मिश्र, राम अचल राजभर, लालजी वर्मा, माजी मंत्री इंदरजीत सरोज यांचाही समावेश होता. सीपीआय(एम)ने एक प्रसिद्धिपत्रक जारी करत सहारनपूर हिंसेचा निषेध नोंदवला आहे. सीपीआय(एम)च्या मते, मायावतींच्या रॅलीनंतर झालेल्या हिंसेसाठी हिंदू युवा वाहिनी जबाबदार आहे. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितलं की, सहारनपूरमध्ये शांती प्रस्थापित झाली आहे. मात्र मायावती स्वतःच्या राजकीय भाक-या भाजण्यासाठी तिथे गेल्या. त्यानंतर तिथली परिस्थिती चिघळली. दोषीविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं आहे.  सहारनपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसेनंतर पोलीस आणि प्रशान गंभीर स्वरूपात दिसले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर गृहसचिव मणिप्रसाद मिश्रा, एजीडी(कायदा-सुव्यवस्था) आदित्य मिश्रा, आयजी (एसटीएफ) अमिताभ यश, डीआयजी विजय भूषण सहीत इतर अधिकारी सहारनपूरमध्ये तंबू ठोकून बसले आहेत. राज्य सरकारनं मृतांना 15 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तत्पूर्वी सहारनपूरमध्ये ठाकूर आणि दलितांमधल्या दोन गटांत वाद उफाळून आला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास जनकपुरीतल्या जनता रोडवर एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर बडगावमध्येही दोघांवर चेहरा झाकून एका अज्ञातानं गोळीबार केला. त्या गोळीबारात रस्त्यावरच दोघे ठार झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकार दलितांनी घडवून आणले आहेत. सहारनपूर परिसरात जबरदस्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एसएसपी सुभाषचंद्र यांनी  सहारनपूर हिंसेप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक केली आहे.