अखंड भारत हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाचा सर्वात महत्वाचा आणि मोठा अजेंडा राहिला आहे. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तसे तर, येणाऱ्या 20 ते 25 वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत 10 ते 15 वर्षांतच साकार होईल. याला रोखणारं कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते हरिद्वार येथे बोलत होते.
भागवत म्हणाले, ज्या पद्धतीने भगवान श्रीकृषांच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचललागेला. त्याच प्रकारे, संत मंडळींच्या आशीर्वादाने भारत लवकरच पुन्हा एकदा अखंड भारत होईल. भारत उत्थानाच्या पटरीवर पुढे जात आहे. याच्या मार्गात जे येतील ते नष्ट होतील. आता भारत उत्थानाशिवाय थांबणार नाही. भारत उत्थानाच्या पटरीवर धावत आहे. तो शिटी वाजवत, उत्थानाच्या या प्रवासात सर्वांनी सोबत यावे, थांबवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, जे कुणी थांबवण्याचा प्रयत्न करणारे आहेत, त्यांनीही सोबत यावे आणि ज्यांना सोबत यायचे नसेल त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे म्हणत आहे.
आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायलाही शिकायला हवे - भागवत म्हाणाले, आपण वेगवेगळे नाही. जर आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायला सुरुवात केली, तर मी विश्वासाने सांगू शकतो, की ज्या गतीने भारत उत्थानाच्या दिशेने वाटचाल करत आहे, भारत अखंड होण्यासाठी केवळ 20 ते 25 वर्षांचाच कालावधी लागेल. आणि जर आपण आपला वेग वाढविला, तर हा काळ अर्ध्यावर येईल आणि असेच व्हायला हवे. एवढेच नाही, तर आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते, असेही ते म्हणाले.
मोहन भगवत हरिद्वारमधील कनखलच्या संन्यास रोड येथील श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि गुरुत्रय मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.